रवी पुजारीच्या 10 हस्तकांना सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात विशेष न्यायालयाने बुधवारी रवी पुजारी टोळीच्या 10 हस्तकांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यांना न्यायालयाने दंडही ठोठावला आहे.

या खटल्यात विशेष न्या. श्रीधर भोसले यांनी इश्रत शेख ऊर्फ राजा, मोहम्मद हश्‍नत खान, आझीम खान, आशफाक सय्यद (बचकाना), असीफ खान ऊर्फ बॉस, शहनवाझ शेख ऊर्फ शानू, फिरोज सय्यद, शब्बीर शेख, रहीम खान, मोहंमद मर्चंट यांना दोषी ठरवले. भट यांना चार वर्षांपूर्वी पुजारी टोळीकडून धमक्‍या देण्यात आल्या होत्या. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, भट यांच्या हत्येची सुपारी मिळाल्याचा जबाब सर्व आरोपींनी दिला होता.

पोलिसांनी आरोपींकडून आठ पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली होती. निर्माता करीम मोरानी यांच्या घरामध्ये गोळीबार केल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासातून हा कट उघड झाला होता. गॅंगस्टर दाऊद इब्राहिमला भट यांचे सहकार्य आहे, असा आरोप पुजारीने केला होता.

Web Title: ravi pujari 10 underling crime punishment