गॅंगस्टर रवी पुजारी टोळीच्या तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - खंडणीसाठी विलेपार्ल्यातील एका प्रसिद्ध हॉटेलसमोरच गोळीबार करणाऱ्या तिघांना खंडणीविरोधी पथकाच्या कक्षाने अटक केली आहे. गॅंगस्टर रवी पुजारीच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती चौकशीत दिली आहे. या तिघांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्यांची माहिती पोलिसांनी दिली 

मुंबई - खंडणीसाठी विलेपार्ल्यातील एका प्रसिद्ध हॉटेलसमोरच गोळीबार करणाऱ्या तिघांना खंडणीविरोधी पथकाच्या कक्षाने अटक केली आहे. गॅंगस्टर रवी पुजारीच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती चौकशीत दिली आहे. या तिघांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्यांची माहिती पोलिसांनी दिली 

सुरेश पुजारी (54), रमेश पुजारी (49), मृत्युंजय दास (34) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात विलेपार्ल्याच्या हनुमान रोड येथील एका प्रसिद्ध हॉटेलसमोर दुचाकीवरून तोंडावर रुमाल बांधून आलेल्या या तिघांनी ही धमकी दिली होती. हॉटेलमध्ये शिरत त्यांनी एका वेटरला बंदूक दाखवत मालक शेट्टी यांच्याबाबत विचारणा केली. आम्ही रवी पुजारीकडून आल्याचे सांगत त्यांनी खिशातील चिठ्ठी काढून नोकराच्या हाती दिली. "तेरे अंदर के बाप को ये देना, और कॉल नही किया तो उपर भेज देंगे', असे म्हणत एक गोळी झाडून धमकावले. त्यानंतर तेथून तिघांनी पळ काढला होता. 
याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यांचा तपास पुढे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ, सचिन कदम यांच्या पथकाने सुरेश आणि रमेश यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्यांची कबुली देत, मृत्युंजयच्या सहभागाबाबत ही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली. 

रवी पुजारीच्या सांगण्यावरून हा कट रचला होता. रवी पुजारीचे हस्तक आणि अटक आरोपी गुजरातच्या जेलमध्ये एकत्र असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. या तिघांवरही हत्या, चोरी, खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे खंडणीविरोधी पथकाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: ravi pujari gang