'पालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद भाजपला देण्यासाठी माझ्यावर दबाव'

'पालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद भाजपला देण्यासाठी माझ्यावर दबाव'

मुंबईः  मुंबई महानगर पालिकेत पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच विरोधी पक्ष नेते पद भाजपला देण्यात यावे यासाठी स्थायी समितीच्या सदस्य दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रवी राजा यांनी हा आरोप केला आहे.  

स्थायी समितीच्या बैठकीत मी प्रश्न विचारत असल्याने मी राजीनामा द्यावा यासाठी माझ्यावर दबाव आणत असल्याचा दावा रवी राजा यांनी केला आहे.  भाजपला विरोधी पक्ष पद द्यावं यासाठी भाजपला सांगण्यात आलं आहे असं मला समजलं आहे, असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

मी वेळोवेळी स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवत असल्याने हा दबाव आला असावा. आम्ही मुंबईकरांच्या हितासाठी कायम काम करणार असं म्हणत कोणाच्या दबावात आम्ही काम करत नसल्याचं रवी राजा यांनी सांगितलं आहे. 

माझ्यावर दबाव आहे याचा परिणाम हा महाविकास आघाडीच्या सरकारवर होईल, असंही ते म्हणालेत. माझ्यावर दबाव आहे हे मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या कानी टाकले आहे त्यावर त्यांनी सांगितले आहे की मुंबईकरांच्या हिताचा निर्णय असेल त्यावर तुम्ही ठाम राहा, असं रवी राजा म्हणालेत. 

दरम्यान रवी राजा यांच्या आरोपावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  रवी राजा यांनी जरी शिवसेनेवर आरोप केले असतील तरी त्यांनी लक्षात घ्यावे की शिवसेनेमुळे त्यांना विरोधी पक्ष नेते पद मिळालं आहे, असं यशवंत जाधव म्हणालेत. 

शिवसेनेने सहकार्य केले नसतं तर त्यांना हे पद मिळालं नसतं. पण ते आज असे का बोलतायत माहित नाही, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीवर याचे परिणाम होतील असे म्हणत असतील तर त्यांनी धमकी तर मुळात देऊ नये शिवसेना अशा धमक्यांना घाबरत नाही. महाविकास आघाडीवर परिणाम होईल असं काही मला वाटत नाही छोटे मोठे मतभेद बसून सोडवले जातील, असंही ते म्हणालेत. 

सुरक्षिततेच्या कारणावर जर सुरक्षा यंत्रनेने कळवलं असेल आणि त्या अनुषंगाने शुल्क आकारायचे असेल तर शुल्क आकारावे की आकारू नये संबंधित  कोणी असतील त्यांनी मागणी केली तर त्या मागणीवर आम्हाला विचार करता येऊ शकतो. स्टॉक एक्सचेंजने अद्याप अशी कोणती मागणी केली नाही आहे. त्यांची मागणी आली तर आम्ही विचार करू, असंही जाधव यांनी म्हटलं आहे. 

पालिकेला तसं त्यांचं पत्र आलं असेल तर त्यावर त्याचा विचार करु. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी जे उपाय करता येतील ते आम्ही करू, असंही यशवंत जाधव यांनी सांगितलं आहे. 

Ravi Raja Allegations bombay Municipal Corporation Standing Committee Chairman Yashwant Jadhav

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com