बॅंक खात्यातील रक्कम काढण्याचे निर्बंध उठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई : नोटबंदीच्या मोहिमेत बॅंक खात्यातून पैसे काढण्यावर घातलेली मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी (ता. 28) काढून टाकली.

आजपासून ( ता. 29) ग्राहकांना त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे काढताना कोणतीही मर्यादा नसेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. मात्र, मोठी रक्कम काढणाऱ्यांना दोन हजार आणि पाचशेच्या नोटा देण्याच्या सूचना बॅंकांना देण्यात आल्या असल्याचेही रिझर्व्ह बॅंकेने आपल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.

पैसे काढण्यावर मर्यादा असल्याने बहुतांश ग्राहक बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात दिरंगाई करत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या निदर्शनात आल्याने दिलासा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बॅंकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे पैसे काढण्यावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पूर्वीप्रमाणे ग्राहकांना बॅंकेतून आणि एटीममधून पैसे काढता येणार आहेत.

Web Title: RBI lifts restrictions on Bank and ATM transactions