esakal | दिवाळी सुटीच्या परिपत्रकात पुन्हा बदल; शिक्षकांना 19 नोव्हेंबरला शाळेत यावे लागणार 
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी सुटीच्या परिपत्रकात पुन्हा बदल; शिक्षकांना 19 नोव्हेंबरला शाळेत यावे लागणार 

दिवाळी सुटी देण्याच्या परिपत्रकामध्ये शिक्षण विभागाने पुन्हा बदल केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची दिवाळी सुटी कायम ठेवली असली तरी शिक्षकांना 19 तारखेलाच शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत

दिवाळी सुटीच्या परिपत्रकात पुन्हा बदल; शिक्षकांना 19 नोव्हेंबरला शाळेत यावे लागणार 

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : दिवाळी सुटी देण्याच्या परिपत्रकामध्ये शिक्षण विभागाने पुन्हा बदल केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची दिवाळी सुटी कायम ठेवली असली तरी शिक्षकांना 19 तारखेलाच शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभागाच्या निर्णयाचा विरोध होऊ लागला आहे. वारंवार होणारा गोंधळ टाळण्यासाठी संघटनांना विचारात घेऊन शिक्षण विभागाने निर्णय घ्यावेत, अशी मागणीही संघटनांनी केली आहे. 

कॉंग्रेसचा आरे व्यापारीकरणाचा प्रस्ताव फडणवीसांनी हाणून पाडला; शेलारांचे प्रत्युत्तर

ऑनलाईन शाळांना प्रथम 12 ते 16 नोव्हेंबर अशी पाच दिवस दिवाळी सुटी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केल्यानंतर अखेर शिक्षण विभागाने सुधारित परिपत्रक जारी केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना 7 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुटी दिली आहे. या परिपत्रकात शनिवारी पुन्हा बदल केला आहे. त्यानुसार दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या कामांसाठी ज्या शिक्षकांना शाळेत बोलावले आहे, त्यांना पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या कामासाठी 19 तारखेला शाळेत येऊन कामे होणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांना दोन-तीन दिवस अगोदर शाळेत यावे लागणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. 

शिक्षण विभागाच्या सुधारित परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षकांची सुटी कमी केल्याने त्यांच्या सुट्या कमी होणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी आम्ही करत होतो; परंतु शिक्षण विभागाने शिक्षक संघटनांना विश्‍वासत न घेताच कारभार करायचा असल्याने हा गोंधळ पुन्हा असाच कायम राहणार आहे. 
- शिवनाथ दराडे,
कार्यवाह, शिक्षक परिषद मुंबई 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )