"तुम्ही व्हिलनची भूमिका निभावली म्हणूनच मी हिरो बनू शकले"; न्यायालयाच्या निकालांनंतर कंगनाची प्रतिक्रिया

सुमित बागुल
Friday, 27 November 2020

अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई मनपाने तोडकामाची कारवाई केल्यांनतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात BMC च्या कारवाईविरोधात याचिका दाखल करत धाव घेतली होती.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई मनपाने तोडकामाची कारवाई केल्यांनतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात BMC च्या कारवाईविरोधात याचिका दाखल करत धाव घेतली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिलाय.

मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कारवाईवर ताशेरे ओढलेत. बृहन्मुंबई महापालिकेची कारवाई हा सत्तेचा आणि अधिकारांचा गैरवापर असल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होतं. नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र व्हॅल्युअरची नेमणूक करून तीन महिन्यात निर्णय घ्यावा. तोडलेल्या कामांचे पुनर्निर्माण करताना नियमानुसार महापालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे. भविष्यात जर कारवाईची वेळ आली तर महापालिकेने ७ दिवसांची नोटीस देऊन पालिकेने कारवाई करावी, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटल आहे.

महत्त्वाची बातमी : "कंगना प्रकरणी 'उखाड दिया'ची नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांच्या खिशातून वसूल करावी..."

महत्त्वाची बातमी : ED ने तयार केला कोठडी अहवाल, प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढणार ?

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाने खास शैलीत पुन्हा एक ट्विट केलंय. तुम्ही व्हिलनची भूमिका निभावली म्हणूनच मी हिरो बनू शकले असं कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणाली आहे.

ट्विटमध्ये कंगना नेमकं काय म्हणाली ? 

"जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो व्यक्तीचा विजय नव्हे तर लोकशाहीचा विजय असतो. या लढ्यात ज्यांनी मला धैर्य दिले, त्या प्रत्येकाचे मी आभार मानते. सोबतच जे कोणी माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसत होते त्यांचे देखील आभार. तुम्ही व्हिलनची भूमिका निभावली म्हणूनच मी हिरो बनू शकले."

reaction of kangana ranaut after verdict by bombay HC on demolition of her office

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of kangana ranaut after verdict by bombay HC on demolition of her office