"ED ला जेव्हा माझी चौकशी करावी वाटेल तेव्हा मी हजर राहीन", सात तासांच्या चौकशीनंतर सरनाईक यांची प्रतिक्रिया

"ED ला जेव्हा माझी चौकशी करावी वाटेल तेव्हा मी हजर राहीन", सात तासांच्या चौकशीनंतर सरनाईक यांची प्रतिक्रिया

मुंबई, ता. 10 : टॉप्स ग्रुपच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आज (गुरूवारी) सक्तवसूली संचलनालय कार्यालयात दाखल झाले. तब्बल सात तास त्यांची चौकशी करण्यात आली. MMRDA एमएमआरडीए कंत्राटातील गैरव्यवहारातील काही रक्कम सरनाईक यांना मिळाल्याचा आरोप आरोप आहे. दरम्यान सरनाई यांनी यापूर्वीच हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्वोच्च न्यायलयाकडून दिलासा मिळाल्यानंतर गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सरनाईक ईडी कार्यालयात दाखल झाले.

राहुल नंदा यांच्याशी असलेले संबंध, एमएमआरडीए कंत्राटातील व्यवहार, अमित चंडोळेच्या चौकशीत निष्पन्न झालेली माहिती आदींबाबत सरनाईक यांची चौकशी करण्यात आली. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास सरनाईक ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

यानंतर सरनाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, "मला जे विचारण्यात आले. त्याची उत्तरे मी दिलेली आहेत. मला पुन्हा चौकशीला बोलावलेले नाही. ईडीला जेव्हा जेव्हा माझी चौकशी करावी, असे वाटेल तेव्हा मी हजर राहीन, असे सरनाईक यांनी सांगितले. मी निर्दोश आहे, त्यामुळे ईडीने संदेशही पाठवला, तरी मी चौकशीला हजर राहीन. राहिला प्रश्न गैरव्यवहाराचा तर ईडीने त्याप्रकरणी चौकशी करून आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, असे सरनाईक यांनी सांगितले."

दरम्यान, चौकशीत आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले आहे. ईडी देशातील मोठी तपास यंत्रणा आहे. त्यामुळे जर काही गैरव्यवहार आहे, तर त्याची चौकशी ईडीने नक्की करावी, असेही चौकशीनंतर सरनाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

एमएमआरडीए मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्या ईडीने त्याच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर  गंभीर आरोप केले होते. चंडोले व शशीधरन यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच चंडोळेचा ताबा ईडीने घेतला होता.

एमएमआरडीए सुरक्षारक्षक कंत्राट मधील 30 टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50 टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा. असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी सांगितले होते. मुंबईतील सर्व उड्डाणपुलांवर सुरक्षारक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे एमएमआरडीए चे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते. 

अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना 5 लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून 6 लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली होती.

( संपादन - सुमित बागुल )

reaction of pratap sarnaik after integration by ED for seven hours in tops group and MMRDA case 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com