'तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच शिक्षा जाहीर केली पाहिजे' - सुबोध भावे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

हैद्राबादमध्ये माणूस म्हणून लाज वाटावी अशी घटना घडली. एका सत्तावीस वर्षीय महिला डॉक्टरवर सामुहीक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर तिला जाळण्यातही आलंय. या घटनेचा संपूर्ण देशभरातून आता  निषेध केला जातोय. हैदराबादमध्येही कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला. सर्वच स्तरातून या भयंकर आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा निषेध कऱण्यात आलाय. या चारही आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणीही आता कऱण्यात येतेय.

एकदा वाचा तर VIDEO | 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा', एकदा पाहा तर..
 
यावर आता देशभरातून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. कायमच आपल्या आसपासच्या अप्रिय घटनांवर भाष्य करणारा अभिनेता सुबोध भावेने देखील हैद्राबादमधील बलात्कारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे, असं रोकठोक मत सुबोध भावेने मांडलंय.

याप्रकरणी आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीये. हैद्राबादमधल्या  पि़डीतेच्या चारही आरोपींना ज्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलंय त्या पोलिस स्टेशन बाहेर संतप्त लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

महत्त्वाची बातमीपहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या मंत्र्यांची लागणार वर्णी..
 
आरोपींच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आलेले पाहायला मिळतायत. तरुणीचा आवाज कुणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. यामध्ये देखील पोलिसांनी आणखी एक खुलासा केलाय. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती असं चौकशीतून समोर आलंय.

WebTitle : reaction of subodh bhave on dr priyanka reddis brutal rape case

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of subodh bhave on dr priyanka reddis brutal rape case