आदित्यच्या विजयाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे? | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबई,ता. 24 : 'ठाकरे' कुटुंबातील निवडणूक लढवणारे पाहिले ठाकरे मोठ्या मताधिक्याने जिंकून आले. आपल्या विजयानंतर आदित्य ठाकरेंनी आपले वडील आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

मुंबई,ता. 24 : 'ठाकरे' कुटुंबातील निवडणूक लढवणारे पाहिले ठाकरे मोठ्या मताधिक्याने जिंकून आले. आपल्या विजयानंतर आदित्य ठाकरेंनी आपले वडील आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

"आई वडील म्हणून आम्हाला नक्कीच अभिमान आहे की स्वतःहुन आदित्य पुढे येतोय आणि स्वतःहून तो पुढे येत असताना जनता त्याला प्रेम देत आहे, आशीर्वाद देत आहे, मी तमाम जनतेसमोर नतमस्तक होतो. हे आशीर्वाद आणि प्रेम कायम आमच्या पाठीशी सदैव असू द्या कारण आपलं प्रेम, आपले आशीर्वाद हीच आमची शक्ति आहे." अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री कुणाचा ? 

लोकसभेनंतर भाजप आणि शिवसेनेचं 50-50 चं सूत्र ठरलंय. चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही भाजपची अडचण समजून घेतली. मात्र, भाजपची प्रत्येक अडचण आम्ही समजून घेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आमचे डोळे उघडलेत. अत्यंत पारदर्शक पद्धतीने जनतेसमोर येऊ. सत्तास्थापनेसाठी वेडेवाकडे निर्णय घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

 

निवडणुकीत हार जीत होत असते. महाराष्ट्राने महायुतीला सत्तास्थापन करण्या-एव्हढ्या जागा दिल्यात. ज्या चुका झाल्यात, त्या चुका परत होणार नाही. याची काळजी घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. येत्या पाच वर्षात अत्यंत जबाबदारीने काम करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हंटले. 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचं अभिनंदन केलंय. विरोधकांनी गेली पाच वर्ष झोपेत घालवली. आता झोपू नका, म्हणजे आमच्यावरचा ताण कमी होईल असंही उद्धव ठाकरे म्हणलेत. 

WebTitle - uddhav thackeray press conference after Vidhansabha election results


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reaction of uddhav thackeray on aaditya thackerays victory