Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर प्रतिक्रियांना सुरुवात; कवाडे-आठवलेंनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kawade Shinde Athawale

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर प्रतिक्रियांना सुरुवात; कवाडे-आठवलेंनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वादावर आणि त्यातून खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या राजीनाम्याच्या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे आणि आठवले गटाकडून यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया आली आहे. या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणावर काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. (reactions comming out about Shrikant Shinde resignation statement Jogendra Kawade Ramdas Athawale expressed)

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे म्हणाले, श्रीकांत शिंदे आणि भाजपचा जो वाद होता तो पाण्यावर काठी मारल्या सारखा आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी झालेली आहे. आम्ही आघाडीचे घटक पक्ष असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा वाद आम्हाला परवडण्यासारखा नाही.

आव्हानं फार मोठी आहेत चॅलेंज फार मोठी आहेत यातून जर तारुन जायचं असेल तर अशा प्रकारचे क्षुल्लक वाद होता कामा नयेत. या वादावर पडदा पडला पाहिजे आणि तो पडेल अशी आम्हाला आशा आहे. हा स्थानिक वाद क्षणापुरताच आहे त्याचं रूपांतर मोठ्या वादात होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.

तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, कल्याणच्या या वादाबाबत मला माहिती नाही. पण हा वाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून मिटवतील. त्यामुळं खासदार श्रीकांत शिंदे यांना राजीनामा देण्याची आवश्यकता नाही.

नेमकं प्रकरण काय?

एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचं राजकारण करून भाजपनं घेतलेल्या असहकार ठरावामुळं खुद्द मुख्यमंत्री यांचं सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे. शिवसेना भाजपा युतीत मिठाचा खडा अस म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपच्या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आम्ही केलेल्या विकास कामामुळं जर कोणाला पोटदुखी होत असेल.

याने युतीत विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असं खासदार शिंदे यांनी म्हटले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप शिवसेना शिंदे गटातील स्थानिक वाद विकोपाला गेला असून शिंदे आपला मतदार संघ सोडतात की भाजपाचे वरिष्ठ यात मध्यस्थी करत मार्ग काढतात हे पहावे लागेल.