ठशामुळे कशी नोकरी गेली हे वाचा...

ठशामुळे कशी नोकरी गेली हे वाचा...

मुंबईतील एका तरुणाला भारतीय रिझर्व बँकेने त्याच्या बोटांचे ठसे दोन वेळेस वेगवेगळे आल्याने नोकरी देण्यापासून नाकारले आहे. तरूणाने सध्या आरबीआय विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्या मते तो एका त्वचेच्या रोगाने ग्रस्त असल्याने हा प्रकार झाले असल्याचे त्याने म्हटले आहे.

अक्षय सकपाळ असे तरूणाचे नाव असून त्याने आरबीआयमध्ये असिस्टंट पदाकरीताची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो उत्तीर्ण देखील झाला मात्र परीक्षेनंतर बायोमेट्रीकच्या चाचणीत त्याचे आधी घेतलेले बोटांचे ठसे एकमेंकाशी न जुळाल्याने त्याला नोकरीवर घेण्यास नकार देण्यात आला, त्यामुळे त्याने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला हायपरहायड्रोसिस हा त्वचेचा रोग असूल्याने बोटांचे ठसे जुळत नाही आहेत, तसेच याबाबत मी आरबीयला कळवले असताना देखील त्यांनी याबाबत काहीच केलेले नाही असेही त्याने याचिकेत लिहिले आहे. 

सध्या न्यायालयाने अक्षय याचे फोटो व बोटांचे ठसे तपासण्याचे आदेश आरबीयला दिले असून संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी करण्यास सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com