वाचा फोर्ड मस्टँगबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी

शशांक पाटील
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

व्हिंटेज कार म्हटले की, सध्या अतिशय कमी लोकांकडे असणारी केवळ दिखाव्याकरिता वापरात असणारी अशी कार हेच सर्वात आधी आपल्या मनात येते. मात्र याच कल्पनेला छेद देणारी फोर्ड कंपनीची मस्टॅंग ही गाडी आजही आपल्या दमदार फायरिंगने रस्त्यावर आपले वर्चस्व गाजवते. 

व्हिंटेज कार म्हटले की, सध्या अतिशय कमी लोकांकडे असणारी केवळ दिखाव्याकरिता वापरात असणारी अशी कार हेच सर्वात आधी आपल्या मनात येते. मात्र याच कल्पनेला छेद देणारी फोर्ड कंपनीची मस्टॅंग ही गाडी आजही आपल्या दमदार फायरिंगने रस्त्यावर आपले वर्चस्व गाजवते. 

हेही वाचा - गाडीला बंद होऊन झाली आहेत चाळीस वर्ष, तरीही क्रेझ तितकीच

जगप्रसिद्ध फोर्ड कंपनीची स्थापना १९ व्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकेचे प्रसिद्ध व्यावसायिक हेन्‍री फोर्ड यांनी केली. तेव्हापासून ते आतापर्यंत फोर्ड ही आघाडीच्या वाहन कंपन्यात मोजली जाते. कंपनीला या स्थानावर पोहचविण्यात महत्त्वाचे स्थान असणारी एक गाडी म्हणजे ‘फोर्ड मस्टॅंग’... मस्टॅंगच्या कल्पनेला १९६४ साली कंपनीचे त्यावेळचे व्यवस्थापक ली लाकोका यांनी जन्म दिला. 

कल्पना जरी त्यांची असली तरी मस्टॅंगला सत्यात उतरवण्यात हजारोंचे हात लागले होते. त्यातील एक म्हणजे जॉन नज्जर. जॉन हे विमानांचे मोठे चाहते. दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ ‘पी-५१ मस्टॅंग फायटर’ हे त्यांचे आवडते विमान. याच विमानाच्या संकल्पनेतून त्यांनी मस्टॅंग ही गाडी तयार केली. त्यामुळे या गाडीचे नावदेखील याच विमानाच्या नावावरून असे देण्यात आले. मात्र हे नाव मिळणे तितके सोपे नव्हते. संबंधित गाडीचा लाढाऊ विमान पी-५१ मस्टॅंग फायटरशी काहीही संबंध नसल्याने हे नाव नाकारण्यात आले.

त्यानंतर जॉन यांनी दुसरी शक्कल लढविली आणि मस्टॅंग या नावाचा शब्दकोशातील अर्थ शोधला. ज्यामुळे जंगली घोडा असा अर्थ असलेली मस्टॅंगवर फोर्डने शिक्कामोर्तब केला. सर्वप्रथम १९६१ मध्ये जॉन यांनी त्यांचे साथीदार फिलीप क्‍लार्क यांच्यासोबत मिळून पहिले डिझाईन तयार केले, ज्याला त्यांनी मस्टॅंग-१ असे नाव दिले. ही गाडी सर्वप्रथम ७ ऑक्‍टोबर, १९६२ रोजी युनायटेड स्टेट्‌स ग्रॅंड प्रिक्‍स या शर्यतीत सर्वांसमोर आली. ही गाडी एफ १ रेसच्या गाड्यांप्रमाणेच धावत असल्याने तिचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यानंतर पुढील काही वर्षांत कंपनीकडून गाडीमध्ये आवश्‍यक ते बदल करण्यात आले आणि १७ एप्रिल, १९६४ रोजी फोर्ड मस्टॅंग ही गाडी अधिकृतपणे बाजारात सादर झाली.

हार्ड टॉप आणि कॉन्वेरटेबल अशा दोन पर्यायात ही गाडी ग्राहकांसाठी सादर करण्यात आली होती. स्टायलिश आणि स्पोर्टी डिझाईनसोबत दमदार पावर यामुळे मस्टॅंग प्रचंड लोकप्रिय झाली. ज्यामुळे पहिल्याच दिवशी तब्बल २२ हजार गाड्यांची बुकिंग झाली, तर पुढील एका वर्षात ४ लाख १७ हजार आणि दोन वर्षांत तब्बल १० लाख गाड्यांची विक्री झाली. 

वाचा - महिंद्रा स्कोर्पिओबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

मस्टॅंगची पहिली पिढी ही शेलबी मस्टॅंग अशा नावाने ओळखली जात होती. याचे कारण या गाडीचे डिझाईन प्रसिद्ध कार रेसर कॅरोल शेलबी यांनी तयार केले होते. १९७०
साली मस्टॅंग गाडीचे जनक ली लाकोका हे फोर्डच्या व्यवस्थापकाच्या खुर्चीवरून थेट अध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. त्यांच्या अख्यारित फोर्डच्या १९७४ साली दुसऱ्या
पिढीचा जन्म झाला. आधुनिक इंजिन आणि सुखमय प्रवास देत असल्याने या पिढीतीलगाड्यांची निर्मिती १९७९ ते १९९३ अशी तब्बल १४ वर्षे करण्यात आली. त्यानंतर १९९४ ते २००४ दरम्यान मस्टॅंगची चौथी, तर २००५ ते २०१४ या काळात पाचवी पिढी बाजारात विकण्यात आली.

काळानुसार हवे ते आधुनिक बदल करत २०१५ मध्ये कंपनीची सहावी पिढी बाजारात दाखल झाली. सहा गिअर, ८ फुटांचे दमदार व्हिलबेस, स्वतंत्र रेअर सस्पेंनशन असलेली ही गाडी सध्या बाजारात प्रचंड मागणीला विकली जात आहे. या गाडीची लोकप्रियता अजून कमी झाली नाही तोवरच कंपनीने सध्याच्या इलेक्‍ट्रिक गाड्यांच्या स्पर्धेत उडी घेत फोर्डची इलेक्‍ट्रिक एसयूव्ही बाजारात दाखल करणार आहे. तशी अधिकृत घोषणा ही कंपनीने १७ नोव्हेंबर, २०१९ रोजी केली आहे. अशा तऱ्हेने १९६४ ते आतापर्यंत अशी गेली ५६ वर्षे फोर्डची मस्टॅंग सामान्य रस्त्यांवर रेस कारसारखी सुसाट धावत आहे.  

मस्टॅंगचे अद्‌भुत वेड

सुरुवातीच्या केवळ दोन वर्षातच १० लाख मॉडेलच्या विक्रमी विक्रीमुळे 
मस्टॅंगने अत्यंत कमी काळात संपूर्ण वाहनविश्‍वाला हलवून ठेवले आणि आपल्या येण्याचा डंकाच वाजविला. आश्‍चर्याची बाब म्हणजे मस्टॅंगच्या वाढत्या 
मागणीमुळे फोर्ड डिलर्सना त्यांची दुकानेदेखील बंद ठेवावी लागली, तर काही ठिकाणी लॉटरी पद्धतीने गाडीची विक्री करण्यात आली. तसेच अमेरिकेत एका मस्टॅंगसाठी इतकी चुरस लागली होती की त्या गाडीसाठी बोली लावण्यात 
आली होती आणि बोली जिंकणाऱ्या ग्राहकाने तर गाडी दुसऱ्या कोणी विकत 
घेऊ नये यासाठी संपूर्ण रात्र गाडीत झोपून काढली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read some things you don't know about the Ford Mustang