सोमवारी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन 

सोमवारी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन 

मुंबई: माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्‍टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये व इतर संस्थांनी आपल्या परिसरात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा, असा सल्ला शिक्षण विभागाने दिला आहे. 

कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामकाजाच्या वेळेत एकत्रित बसून सलग काही तास वाचन करावे, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा चळवळ म्हणून पुढे यावा यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत, असे आदेश सरकारने दिले आहेत. 

वाचू आनंदे तासिका 
यामध्ये एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबवला जावा. प्रत्येक व्यक्ती किंवा शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप असतील अशी पुस्तके भेट द्यावी, शाळांमध्ये वाचू आनंदे तासिका राबवण्यात यावी, कलाम यांच्या पुस्तकावर व्याख्याने, लेखक व कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आंमत्रित करणे, पुस्तक प्रदर्शन, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनाने घडलेले संस्कार याविषयी माहिती देणे व विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे असे विविध उपक्रम राबवण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com