भरपूर वाचन करून डोळसपणे जगा - दवणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई - भरपूर वाचा आणि डोळसपणे जगा. या जगण्यातून, संघर्षातून आणि येणाऱ्या अनुभवांतून खूप छान साहित्य तुम्ही लिहू शकाल. तरुण लेखक-कवी हे साहित्याचे भविष्य आहेत, असे मार्गदर्शन ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी 13 व्या महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

मुंबई मराठी साहित्य संघ आणि गुरुनानक खालसा महाविद्यालयाच्या वतीने हे संमेलन खालसा महाविद्यालयात झाले. त्या वेळी दवणे म्हणाले, 'या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कलाकार, लेखक हे मराठी भाषेचे भवितव्य अधिकाधिक समृद्ध होणार असल्याचेच लक्षण आहे. कुणाच्याही भाषेबद्दल द्वेष करू नका; पण एका वेळी एकाच भाषेचा वापर लिखाणात व्हायला हवा,'' असे मत दवणे यांनी व्यक्त केले. नकार पचवण्याची, संघर्ष करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. भरपूर वाचा, भरपूर जगा आणि भरपूर लिहा, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला. "मराठी चित्रपट बदलतोय का?' या विषयावर अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद, कविसंमेलन आणि एक नाटिकाही सादर झाली.

Web Title: By reading a lot of the world life