अजित पवारांच्या INSIDE PHOTO चं व्हायरल सत्य असत्य..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील 'सत्ता'बाजार चांगलाच तेजीत आहे. अशात मिनिटा-मिनिटाला या नाट्यामध्ये वेगवेगळी माहिती समोर येताना पाहायला मिळतेय. काल सकाळी देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला.  

महाराष्ट्रातील 'सत्ता'बाजार चांगलाच तेजीत आहे. अशात मिनिटा-मिनिटाला या नाट्यामध्ये वेगवेगळी माहिती समोर येताना पाहायला मिळतेय. काल सकाळी देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला.  

दरम्यान, काल सकाळपासून नेपियनसी रोडवरील निवासस्थानावर वास्तव्यास असलेले अजित पवार रात्री महालक्ष्मी निवासस्थानावर दाखल झालेत. त्यानंतर काही महत्त्वाचे भाजप नेते अजित पवार यांना भेटल्याची देखील माहिती समोर येतेय. याचा पार्श्वभूमीवर अजित पवार, आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि दिलीप वळसे पाटील यांचे दोन फोटो व्हायरल झालेत. मात्र हा फोटो खरंच आजचा आहे का याचा आम्ही व्हायरल चेक केला. त्यानंतर आमच्या पडताळणीत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली.

Image may contain: 3 people, people sitting

 

Image may contain: 4 people, people smiling, people sitting

 

माध्यमांसमोर आलेले आणि सोशल मीडियावर फिरणारे हे दिलीप वळसे पाटील, अजित पवार, आशिष शेलार, प्रकाश मेहता यांचे फोटो हे राष्ट्रवादीच्या विधीमंडळ दालनातील असल्याची माहिती आता समोर येतेय. व्हायरल झालेले हे फोटो खोटे असल्याचं समोर येतंय.  

दरम्यान आज दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या घरी ठाण मांडून आहेत. अशातच भाजपचे राणा जगजीत सिंह यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतलीये. या नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे हे अजित पवार यांची मनधरणी करून घराबाहेर पडले आहेत. अजित पवार यांनी निर्णय बदलावा अशी त्यांनी विनंती केली. त्यासोबतच भाजपने प्रयत्न करण्यासाठी दोन आमदार पाठवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 

Webtitle : reality of those viral photos of ajit pawar and NCP as well as BJP leaders  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reality of those viral photos of ajit pawar and NCP as well as BJP leaders