सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याचे कारण अस्पष्ट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्यावर एका मद्यपीने शुक्रवारी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कुणाल जाधव या तरुणाला अटक केली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

अंधश्रद्धेविरुद्ध प्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराजांचा बुद्ध जयंतीनिमित्त मुंबईतील दादर येथील नायगाव परिसरात कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी महाराजांसोबत छायाचित्रे काढली. या वेळी गर्दीत तोंडाला रुमाल बांधून किशोर जाधव हा युवक त्यांच्याजवळ पोचला. त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवत असल्याचे दाखवत चाकूने त्यांच्या पोटावर वार केले. त्यानंतर महाराजांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी रुग्णालयाने महाराजांना घरी जाण्याची परवानगी दिली. जमावाने जाधवला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. हल्ला करताना तो दारू प्यायला होता. 

Web Title: The reason for the attack on Satyapal Maharaj was unclear