भाजप बंडखोर आमदार गीता जैन स्वगृही!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

जैन यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना नेतृत्वाने फिल्डिंग लावली होती.

मीरा रोड : मीरा-भाईंदरमधून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा दणदणीत पराभव करून जायंट किलर ठरलेल्या भाजपच्या बंडखोर अपक्ष आमदार गीता जैन यांनी अखेर रविवारी (ता.27) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला पाठिंबा जाहीर केला. जैन यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना नेतृत्वाने फिल्डिंग लावली होती. यावेळी त्यांचे पती भरत जैन त्यांच्यासोबत होते.

आमदार झाल्यानंतर जैन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षात येण्याचे आवाहन केले होते. मीरा-भाईंदर मतदारसंघातून जैन यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षनेतृत्वाने मेहतांच्या झोळीत झुकते माप टाकले होते. मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार म्हणून ओळखले जात होते.

- ...तर उदयनराजेंना द्यावा लागला असता निवडणुकीचा खर्च

शहरात नरेंद्र मेहता यांची मलीन झालेली प्रतिमा आणि नागरिकांमध्ये विविध कारणांमुळे त्यांच्याविषयी असलेला रोष यामुळे भाजपकडून मेहता यांना उमेदवारी मिळणार नाही, ही अपेक्षा फोल ठरल्याने जैन यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी जैन यांना पक्षातून निलंबित केले होते.

- जेव्हा पेटीत सापडतात सोने-चांदीचे शिक्के...

कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर भाजपमध्येच कायम राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दुसऱ्या पक्षाकडूनही मला मोठी ऑफर देण्यात आली होती.
- गीता जैन, आमदार, मीरा-भाईंदर

- 'क्‍यार' चक्रीवादळाने धारण केले रौद्ररूप; काय होतील भारताच्या किनाऱ्यावर परिणाम?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebel Independent MLA Geeta Jain met Chief Minister Devendra Fadnavis and announced his support to the BJP