पेणमध्‍ये पोलिसांना मदत करणाऱ्या धाडसी नागरिकांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबई :  पेण शहरातील सोन्याच्या पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या नागरिकांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन जाधव यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

26 जुलैला शहरात सोन्याच्या पेढीवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सहा जणांच्या आंतरराज्यीय टोळीतील दोन दरोडेखोरांना पेण पोलिसांनी थरारक पाठलाग करत पकडले. या वेळी इतर दरोडेखोर पेणनजीक आंबेगाव जंगलाच्या हद्दीत पळाले.

या वेळी तरणखोप येथील दिनेश पाटील, गणपती वाडी येथील आमोद मुंढे, शैलेश जोशी, पेण व आंबेगाव आदिवासी वाडी येथील सुभाष जाधव, नवनाथ जाधव, दीपक पवार व नीलेश वाघमारे यांनी रात्री जंगलात पोलिसांना सहकार्य करून पळालेल्या एका आरोपीला पकडण्यासाठी सहकार्य केले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reception of brave citizens who helped police in Pen