Mumbai Rains : मुंबईत आठ ठिकाणी दोनशे मिलीमीटरहून जास्त पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सर्वाधिक पाऊस मालाडमध्ये 402 मिमीएवढा झाला. त्याखालोखाल मुलुंड (प) 380 मिमी, पवईत 250 मिमी, जोगेश्वरी लिंक रोड आणि भांडुप (प) येथे 290 मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबई : रात्रभर कोसळलेल्या पावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला पूर्णपणे बोजवारा उडवला आहे. शनिवारी दिवसभराच्या संततधारेमुळे आठ ठिकाणी दोनशे मिलीमीटरहून जास्त पावसाची नोंद झाली.

सर्वाधिक पाऊस मालाडमध्ये 402 मिमीएवढा झाला. त्याखालोखाल मुलुंड (प) 380 मिमी, पवईत 250 मिमी, जोगेश्वरी लिंक रोड आणि भांडुप (प) येथे 290 मिमी पावसाची नोंद झाली. मुलुंड पूर्वेला 280 मिमी, कांदिवली (प.) येथे 280 मिमी, कांदिवली लोखंडवाला येथे 270 मिमी पावसाची नोंद झाली.

रविवारीही मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात अतिवृष्टीचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. आज दुपारी 4.5 मीटरच्या उंच लाटा समुद्रात उसळणार आहेत. शिवाय सोमवारपर्यंत समुद्रही खवळलेला राहील, त्यामुळे घराबाहेर जाऊ नका, असे आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: record break rainfall in Mumbai