ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; गतवर्षीचा रेकॉर्ड मोडला

दीपक शेलार
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शनिवारपासुन आज (रविवारी) सकाळी साडेआठपर्यंत 284 मिमी पावसाची नोंद झाली असून सकाळी साडेनऊ पर्यत सुमारे 300 मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी या कालावधी पर्यंत एकूण 2707 मिमी पाऊस पडला होता.

ठाणे : गेले चार दिवस कोसळत असलेल्या पावसाने ठाण्यात रोद्ररूप धारण केले आहे.

शनिवारपासुन आज (रविवारी) सकाळी साडेआठपर्यंत 284 मिमी पावसाची नोंद झाली असून सकाळी साडेनऊ पर्यत सुमारे 300 मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी या कालावधी पर्यंत एकूण 2707 मिमी पाऊस पडला होता. यंदा एकूण 2708 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद ठाणे मनपा आपत्कालीन कक्षाकडे झाली आहे.

दरम्यान, बेस्टची बोरीवली सेवा सुरू असली तरी ठाणे येथून बोरीवली, मिरारोड, नालासोपारा येथे जाणारी टीएमटीची बस सेवा केवळ घोडबंदर रोडपर्यत चालवली जात आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर नितिन कंपनी जंक्शनवर वृक्ष कोसळल्याने वाहतुक अडली. शहरात एकुण 35 वृक्ष कोसळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: record breaking rain in Thane