नवी मुंबईत प्रदूषणाचा ‘रेड अलर्ट’ 

नवी मुंबईत प्रदूषणाचा ‘रेड अलर्ट’ 

मुंबई: नवी मुंबईत शुक्रवारी (ता. १५) प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड वाढ झाली. तरंगत्या धूलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण प्रतिघनमीटर हवेत ३१७ मायक्रोग्रॅम नोंदवण्यात आले. ही पातळी अत्यंत धोकादायक असून, शनिवारीही अशीच स्थिती राहण्याचा अंदाज ‘सफर’ संकेतस्थळावर वर्तवण्यात आला आहे.

नवी मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी दोन-तीन दिवस कायम राहिल्यास श्‍वसनविकाराचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार पीएम २.५ चे प्रमाण १० मायक्रोग्रॅमपर्यंत असल्यास हवा अशुद्ध मानली जाते. हे प्रमाण भारतात ५० मायक्रोग्रॅम असून, मुंबईत शुक्रवारी ते १२७ मायक्रोग्रॅम होते.

खंडाळा घाटात वाहनांमुळे होणारे प्रदूषण समुद्रसपाटीकडे वाहून येते. औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषणाचा फटकाही नवी मुंबईला बसतो, असे ‘सफर’चे निरीक्षण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com