खारघर - वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवा

गजानन चव्हाण 
शुक्रवार, 29 जून 2018

खारघर (मुंबई) : डीएव्ही पब्लिक स्कुल कडून, व्हीबग्योर आणि संजीवनी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने शाळकरी विद्यार्थी आणि पालकांना चालताना त्रास होत आहे. सिडकोने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी सिडकोकडे केली आहे.

खारघर सेक्टर 15 डीएव्ही पब्लिक स्कुल, व्हीबग्योर आणि संजीवनी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहे, तसेच काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी तुबते. काही ठिकाणी रस्त्यावर उन्हाळ्यात खोदकाम केले होते, ते जैसे थे आहे. या तिनही शाळेत तीन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. काही विद्यार्थी रस्त्याने चालत येतात, तर काही पालक मुलांना दुचाकी, चार चाकी वाहनाने सोडतात. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे शालेय मुलांचे अपघात होवू शकतो. पनवेल पालिकेचे महापौर, कविता चौतमाल, सभागृह नेते परेश ठाकूर, सिडकोचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांनी नुकतीच पाहणी केली असता, त्यांनाही सदर रस्त्यावर शालेय मुले आणि पालकांचे ये- जा करण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे सिडकोने सदर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करावे असे सिडकोच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती.

असे असून देखील सिडको अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत असल्यामुळे पालक वर्गात नाराजी पसरली आहे. सिडकोने त्वरित काम हाती घ्यावे अशी मागणी संजना कदम यांनी केली आहे.

Web Title: refill the potholes on road have rush