प्रादेशिक भाषांमध्ये ई-मेल वापरात "मराठी' दुसरी

प्रादेशिक भाषांमध्ये ई-मेल वापरात "मराठी' दुसरी

वापरकर्त्यांचे प्रमाण 20 टक्के
मुंबई - दररोज नऊ हजार यूजर मराठी ई-मेल आयडी वापरतात. या बाबतीत हिंदीचा पहिला, तर मराठीचा दुसरा क्रमांक लागतो. मराठी ई-मेल आयडी वापरणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्के आहे.

सध्या आठ भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरता येतात. एप्रिलपर्यंत आणखी चार भाषांची भर त्यात पडेल. लवकरच एकंदर 22 भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरता येऊ शकेल.

सध्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केवळ आठ भाषांमध्ये ई-मेल आयडी तयार करण्याचा पर्याय दिला आहे. आणखी 22 भाषांमध्ये हा पर्याय देण्याचा विभागाचा संकल्प आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय भाषांमधून ई-मेल आयडी वापरण्यातील अडचणी सोडवण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत देशपातळीवर भारतीय भाषांमधून ई-मेल आयडी वापरण्यासाठी पुरेशी तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आतापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे स्थानिक भाषेतून ई-मेल स्वीकारणे किंवा पाठवणे शक्‍य होत नव्हते. पण बीएसएनएल, एमटीएनएल, गुगल यांसारख्या कंपन्यांनी सर्व्हरमध्ये अपग्रेडेशन केल्यामुळे स्थानिक भाषेतून ई-मेल पाठवणे शक्‍य झाले. याहू, रेडीफ आदींच्या सर्व्हरवर अजूनही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांना अडचणी सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती डेटा एक्‍सजेन टेक्‍नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय डाटा यांनी दिली.

हिंदी ई-मेल आयडी वापरणाऱ्यांचे प्रमाण 50 टक्के आहे, तर मराठी वगळता इतर सहा भाषांचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. चीन, रशिया, अरेबिक भाषा वापरणाऱ्यांनाही आपल्या भाषेतून ई-मेल आयडी वापरता येतात. त्यामुळे या देशांमध्येही इंग्रजीला मागे टाकत स्थानिक भाषांमध्ये ई-मेल आयडी वापरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती डाटा यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com