RTOच्या मर्जीतील लघुलेखकांचा एकाच कार्यालयात ठिय्या

RTOच्या मर्जीतील लघुलेखकांचा एकाच कार्यालयात ठिय्या

मुंबई:  प्रादेशिक परिवहन विभागातील लघुलेखक वर्ग 3 पदावरील कर्मचारी नियुक्तीपासून एकाच कार्यालयात ठाण मांडून बसले आहे. लघुलेखक हे आरटीओ अधिकाऱ्यांचे स्टेनो म्हणून काम करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मर्जीतील सर्व आर्थिक कामकाजासह प्रशासकीय काम सुद्धा यांच्या मार्फतच केले जात असते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक लघुलेखक आरटीओचे विश्वासू असल्याने, या पदावरील कर्मचाऱ्यांची अद्याप बदलीच केली जात नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांमध्ये लघुलेखकाचे एक पद असून, आरटीओ अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यकाचे काम या लघुलेखक कम स्टेनो यांच्याकडे असते. त्यामुळे कार्यालयीन ड्युटी पत्रक, अधिकाऱ्यांचे दौरे, भरारी पथकांची ड्युटी असे अत्यंत गोपनीय काम लघुलेखक पदावरील कर्मचारी करतो. आरटीओ आणि दलालांचे संबंध जपून आर्थिक हितसंबंधातील मलिदा जमा करण्याचे काम सुद्धा याच कर्मचाऱ्याकडे असते. त्यामुळे मर्जीतील लघुलेखकांच्या बदल्याच अद्याप केल्या जात नसल्याचे आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

राज्यात एकूण सुमारे 22 पद मंजूर आहे त्यापैकी 14 पद भरले असून 8 पद अद्याप रिक्त आहे. या कर्मचाऱ्यांची आरटीओच्या कामकाजावर संपूर्ण पकड असल्याने, लघुलेखक आरटीओ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील झाले आहे. राज्य शासनाच्या बदलीचा कायदा 2005 अंतर्गत आरटीओतील लघुलेखक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करने अनिवार्य होते. या कायद्यानुसार सर्व शासकीय कार्यालयातील लघुलेखकांच्या बदल्या 3 ते 6 वर्षात केल्या जाते. परंतु आरटीओ विभागातील लघुलेखक पदाच्या बदल्यांसाठी परिवहन विभागाने गेल्या कित्येक वर्षांपासून बदली कायद्याची अमंलबजावणीच केली नसल्याचे दिसून येत आहे.  आरटीओच्या विभाग पातळीवर एकच पद असल्याचे भासवून परिवहन विभागाकडून लघुलेखक पद बदलीस पात्र नसल्याचे सांगितल्या जात आहे. 
 
नियुक्तीच्याच ठिकाणी अनेकांना बढती
 
लिपीक टंकलेखक म्हणून आरटीओ विभागात नियुक्ती झालेले कर्मचाऱ्यांनाच लघुलेखक पदावर बढती देण्यात आली आहे. राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयांमध्ये हा प्रकार घडला असून, लघुलेखक पदावरील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रियेची अमंलबजावणीच केली नसल्याने आरटीओ कार्यालयात अनागोंधी कारभार सुरू असल्याते दिसून येत आहे.

लघुलेखकाचे परिवहन विभागात जास्त पद नाहीत. विभागीय पातळीवर एकच पद आहे. जर या पदाच्या आतापर्यंत बदल्या झाल्या नसेल तर तशी बदली प्रक्रिया राबविण्यात येईल.
अविनाश ढाकणे, आयुक्त,परिवहन विभाग

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com