विशेष लोकल उत्तमच्या नियमित दहा फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पश्‍चिम रेल्वेवर मंगळवारी (ता. ५) महिला प्रवाशांसाठी ‘उत्तम’ रेक आणि आकर्षक डिझाइन असलेली लोकल चर्चगेट ते विरार मार्गावर धावली.

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवर मंगळवारी (ता. ५) महिला प्रवाशांसाठी ‘उत्तम’ रेक आणि आकर्षक डिझाइन असलेली लोकल चर्चगेट ते विरार मार्गावर धावली. उद्यापासून (बुधवार) या लोकलच्या नियमित १० फेऱ्या होणार आहेत. या लोकलने आता सर्वसामान्य प्रवासी देखील प्रवास करु शकणार आहेत.

चर्चगेट ते विरार मार्गावर उत्तम रेक असणारी महिला विशेष लोकल धावली. ही लोकल चर्चगेटहून संध्याकाळी ६.१५ वाजता सुटून विरारला रात्री ७.५७ वाजता पोहचली. बुधवारपासून या लोकलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

त्यासाठी सामानाकरिता जादा जागा, अधिक चांगली आसनव्यवस्था आणि डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. प्रथम श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे. डब्याला निळ्या रंगाऐवजी तपकिरी रंग देण्यात आला आहे.

web title : Regular ten rounds of women's special local 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regular ten rounds of women's special local