अपंग विद्यार्थ्याचा प्रबंध नाकारला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - अपंग विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी सवलत देण्याचे मुंबई विद्यापीठाचे परिपत्रक आहे; मात्र एलएलएमच्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्राची परीक्षा देणाऱ्या संतोषकुमार यादव या अपंग विद्यार्थ्याचा विधी शाखेनेच हा हक्क नाकारला आहे. यामुळे पायाने पेपर लिहिलेल्या या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. 

मूळचा उत्तर प्रदेशातील अजमगडचा रहिवासी असलेल्या संतोषकुमारला सहाव्या वर्षी हात गमवावे लागले. तेव्हापासून त्याने पायाने परीक्षा देत एमएलएमच्या परीक्षेपर्यंत मजल मारली आहे. तो सध्या मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेतून एलएलएमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. 

अपंग विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी अतिरिक्त वेळ आणि आवश्‍यक ती मदत करण्याचे परिपत्रक विद्यापीठाने काढले आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दोन प्रबंध परीक्षेच्या आधी विद्यापीठाला सादर करायचे असतात. ते सादर करण्याची मुदत ५ जूनपर्यंत होती. परीक्षेचा अभ्यास आणि इतर वैयक्तिक कारणामुळे संतोषकुमारला प्रबंध सादर करता आला नाही. त्यामुळे त्याने यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती संबंधित विभागाकडे पत्राद्वारे केली. संबंधित प्राध्यापक रजेवर असल्यामुळे त्याची मागणी मान्य झाली नाही. यानंतर त्याने कुलगुरुंची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण कर्मचाऱ्यांनी त्याला कुलगुरुंची भेट घेण्याची संधी दिली नाही. 

आपले प्रबंध पूर्ण करून ते सादर करण्यासाठी तो १३ जून रोजी विधी शाखेत गेला; पण ते जमा करून घेण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याचे त्याने सांगितले. विद्यापीठाच्या नियमानुसार अपंग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ देणे आवश्‍यक आहे; पण कर्मचारी या नियमांचे पालन करीत नसल्याचा आरोप संतोषकुमारने केला आहे. 

अपंग विद्यार्थ्याचा प्रबंध स्वीकारण्यात आला नसल्याची तक्रार मला आता समजली आहे. याबाबत विभागातून अधिक माहिती घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल. 
- मुरलीधर कुऱ्हाडे, विधी शाखेचे समन्वयक

Web Title: Rejected the thesis student with disabilities