बेलापूरमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत कक्ष

बेलापूरमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत कक्ष
बेलापूरमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत कक्ष

नवी मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी कोकण विभागीय मदत कक्षाचे उद्‌घाटन रविवारी (ता. ११) सकाळी ८ वाजता बचत भवन, सीबीडी बेलापूर येथे करण्यात आले. सोमवार (ता.१२) पासून हा कक्ष सुरू करण्यात येणार आहे. उपायुक्त महसूल सिद्धराम सालिमठ यांच्या नियंत्रणाखाली हा कक्ष सुरू राहणार आहे. 

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी दिली आहे. पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरूपातील मदत जमा करावी, असे आवाहनही शिवाजीराव दौंड यांनी केले. आर्थिक मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांसाठी ब्लॅंकेट, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी आवश्‍यक वस्तू, सॅनिटरी नॅपकीन इत्यादी तसेच पुरुषांसाठी टी-शर्ट, स्वेटर तसेच लहान मुलांसाठी पॅंट, कानटोपी, स्वेटर असे फक्‍त नवीन पोशाख स्वीकारले जातील. जुने कपडे देऊ नयेत. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ, यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडीक्‍लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्‍स, स्लीपर, पाणी बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. त्याचबरोबर साखर-मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा मालदेखील स्वीकारला जाणार असल्याचे कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com