ठाणे-पालघरमधील शेतकऱ्यांना पाणी टंचाईतून दिलासा

शर्मिला वाळुंज
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

उन्हाळ्याच्या दिवसात ठाणे व पालघर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवते. पाणी नसल्याने अनेक गावकरी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करतात. ग्रामीण भागातील पाणी नियोजन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रोटरी क्‍लबने पुढाकार घेत ठाणे व पालघर जिल्ह्यात 432 बंधारे बांधले आहेत. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार आहे. 

ठाणे : उन्हाळ्याच्या दिवसात ठाणे व पालघर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवते. पाणी नसल्याने अनेक गावकरी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करतात. ग्रामीण भागातील पाणी नियोजन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रोटरी क्‍लबने पुढाकार घेत ठाणे व पालघर जिल्ह्यात 432 बंधारे बांधले आहेत. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार आहे. 

ठाणे पालिकेत सत्ताधारी-प्रशासन आमने-सामने

ठाणे व पालघर जिल्ह्यात पाऊस चांगला झाला तरीही उन्हाळ्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. धरणे जवळ असले तरीही गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा नसल्याने हे गावपाडे तहानलेलेच असतात. नागरिकांची ही अडचण लक्षात घेत रोटरीतर्फे ठाणे व पालघर जिल्ह्यात बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. रोटेरियन हेमंत जगताप यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत ग्रामीण पाणी नियोजन या माध्यमातून 14 कोटींच्या आसपास निधी संकलित करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येत आहे. 

27 गावांच्या स्वतंत्र पालिकेसाठी दोन महिन्यांचा अवधी

गेल्या काही वर्षात दोन्ही जिल्ह्यात सुमारे 432 बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व "चेकडॅम' प्रकल्पांमुळे सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येला पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना दुबार पिकासाठी पाणी, गुराढोरांना पिण्यासाठी पाणी व जमिनीतील पाण्याच्या स्तराची वाढ होऊन परिसरातील विहिरी व बोअरवेलना अधिकचे पाणी मिळणे, हा या सर्व प्रकल्पांचा उद्देश हा त्रिस्तरीय उद्देश असल्याचे सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार 

  • आंतरराष्ट्रीय रोटरी चळवळीची भारतातल्या प्रवेशाची यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रोटरी क्‍लब ऑफ ठाणे प्रीमियम यांच्या पुढाकाराने रोटरी क्‍लब ऑफ लिंक टाऊन ऐरोली यांनी मुरबाड व भिवंडी तालुक्‍यात 9 "चेक डॅम' बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
  • मुरबाड तालुक्‍यातील खापरी, उमरोळी, फंगलोशी अ व ब अणि वेळूक अशा 5 गावांमधील 5 हजार 188 लोकसंख्येला या बंधाऱ्यांचा फायदा होणार आहे. तर, भिवंडी तालुक्‍यातील दिघाशी, डालोंधे, रावाडी आणि राउतपाडा या चार गावातील 3 हजार 500 लोकसंख्येला त्याचा फायदा होणार असल्याचे रोटरीच्यावतीने सांगण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे भेंडी, टोमॅटो व इतर भाजीपाला आदी नगदी पिके घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रतिएकरी वीस हजार रुपयांहून अधिकने वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief from shortage of water to farmers in Thane-Palghar