esakal | महाराष्ट्राला मंजुरीपेक्षा कमी रेमडेसीविर
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

महाराष्ट्राला मंजुरीपेक्षा कमी रेमडेसीविर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडची (Covid) विदारक स्थिती पाहून केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक 5,36,248 रेमडेसिविर (Remadesivira) इंजेक्शन डोस मंजूर केले. मात्र त्यातील केवळ 1,47,332 डोस प्राप्त झाले असल्याचे माहितीच्या अधिकारात (RTI) समोर आले. आरटीआय (RTI) कार्यकर्ते जितेंद्र घाडगे (Jitendra Ghadage) यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सर्वाधिक 5,36284 रेमडेसिविर (Remadesivira) इंजेक्शन महाराष्ट्राला मंजूर केले.

मात्र प्रत्यक्षात राज्याला 3,29,700 इंजेक्शन मिळाले. इंजेक्शन पुरवणाऱ्या एका कंपनी कडून 3,53,916 इंजेक्शन येणे अपेक्षित असतांना त्यापैकी केवळ 1,47,332 इतकेच इंजेक्शन्स प्राप्त झाले, त्यामुळे महाराष्ट्राला फटका बसला असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण केलेले आकडे पाहिले तर असे दिसते की देशात सर्वाधिक 5,14,612 इंजेक्शन तामिळनाडू राज्याला मिळाले तर त्रिपुरा राज्याला सगळ्यात कमी म्हणजे 720 इंजेक्शन्स मिळाले आहेत. प्रत्यक्षात इंजेक्शन मिळाल्याची माहिती पाहिली तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: ढगफुटीच्या हिटलिस्टवर महाराष्ट्र

एचएलएल लाईफ केअर नामक शासकीय कंपनीने एकूण सात वेगवेगळ्या औषध कंपन्यांकडून रेमदेसीविर इंजेक्शन्स मागवून ते सर्व राज्यांना वाटप केले. मात्र हे इंजेक्शन उशिरा मिळाल्याने त्याचा खूप मोठी किंमत सर्वसामान्य लोकांना मोजावी लागली. दुसरी लाट ऐन भरात असतांना एप्रिल आणि मे महिन्यात बऱ्याच गरजूंना हे इंजेक्शन काळ्या बाजारात 10 ते 80 हजार रुपये मोजून खरेदी करावे लागले.

महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांनी कोविड संसर्गा संदर्भात पारदर्शकतेने आकडेवारी जाहीर केली, त्यामुळेच त्याचा फायदा झाला असून या राज्यांना रेमदेसीविर चा सगळ्यात अधिकचा साठा मिळाला.पारदर्शकते अभावी उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांना फटका बसला असून त्यांना फार कमी प्रमाणात साठा मिळाला.गुजरातला केवळ 5184 इंजेक्शन देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त एचएलएल कंपनीने 46 करोड कोव्हीशिल्ड व्हॅक्सीन एकूण 7245 कोटी रुपयात सिरम इन्स्टिट्यूट कडून घेतली आहेत. तसेच 26 करोड कोव्हॅक्सीन 4095 कोटी रुपये खर्चून भारत बायोटेक कडून विकत घेतली असल्याचे ही माहितीच्या अधिकारात सांगितले आहे.

हेही वाचा: Khed : दिल्लीला महाराष्ट्र कळत नाही

सगळ्या राज्य सरकार यांनी पारदर्शकतेने कोविड संसर्गाची आकडेवारी जाहीर करणे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर त्याचा फटका त्याच राज्यातील सामान्य जनतेला बसतो. आपल्याकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोविडच्या नवीन लक्षणांवर लागणाऱ्या औषध उपचारांची सोय आधीच करणे गरजेचे आहे.

-जितेंद्र घाडगे , संयोजक , दी यंग व्हीसलब्लॉवर्स फाउंडेशनचे संयोजक

loading image
go to top