सर्व अडथळे आठवड्यात दूर करा - राज्यमंत्री वायकर

सर्व अडथळे आठवड्यात दूर करा - राज्यमंत्री वायकर

जोगेश्‍वरी  - जोगेश्‍वरी पूर्वेतील संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज रस्त्यावरील (जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड) वाहतूक सुरळीत होण्यासाठी सात दिवसांत या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा. तसेच येथील सर्व्हिस रोड तत्काळ सुरू करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी (ता. 2) मेट्रो, वाहतूक शाखा, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसे न झाल्यास शिवसेनेला नाइलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडवर मेट्रो-6 चे काम सुरू आहे. राज्यमंत्री वायकर यांनी बुधवारी सकाळी मेट्रो, मुंबई महापालिका, वाहतूक शाखा, एमएमआरडीए, मेघवाडी व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे यांच्यासमवेत येथे पाहणी दौरा केला. जोगेश्‍वरी पूर्वेतील सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिकेने करोडो रुपयांची निविदा काढली आहे. त्यासंबंधी वायकर यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चाही केली. त्याचप्रमाणे सर्व्हिस रोड सुरू करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देशही त्यांनी "मेट्रो'च्या अधिकाऱ्यांना दिले. 

चार अपघात; एक गंभीर 
सात दिवसांत या रस्त्यावर चार अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सायली राणे या मुलीला भरधाव कारने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. राज्यमंत्री वायकर यांनी रुग्णालयात जाऊन या मुलीच्या तब्येतीची डॉक्‍टर व तिच्या नातेवाइकांकडे विचारपूस केली. तिच्या उपचारासाठी रवींद्र वायकर, नगरसेवक प्रवीण शिंदे यांनी आर्थिक मदतही केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com