नाल्यांवरील अतिक्रमणे काढा महापौरांचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सांताक्रुझ (पूर्व) येथील गोळीबार रोडजवळच्या संभाजी नाल्याची आज महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पाहणी केली. नाल्यावर केलेली अतिक्रमणे काढून नालेसफाई तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले. 

मुंबई - सांताक्रुझ (पूर्व) येथील गोळीबार रोडजवळच्या संभाजी नाल्याची आज महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पाहणी केली. नाल्यावर केलेली अतिक्रमणे काढून नालेसफाई तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले. 

पावसाळापूर्व नालेसफाई पूर्ण करण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी येथील नाल्याची पाहणी केली. दरम्यान, नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले. यामुळे नाला अरुंद झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. गणेशकृपा, आंबेवाडी, मानसेवाडी, चारनळ या पाच हजार लोकवस्तीच्या परिसरात पाणी साचत असल्याचे नगरसेविका प्रज्ञा भूतकर यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. नाल्याचे रुंदीकरण करून नालेसफाई लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. 

Web Title: Remove of encroachment on canals, Mayor's order