अलिबाग स्थानकावर  सव्वासहा कोटींचा खर्च 

अलिबाग एसटी आगार
अलिबाग एसटी आगार

अलिबाग : खड्डे, अस्वच्छतेसह अनेक गैरसोईंचे आगार असलेले अलिबाग एसटी बसस्थानक दोन वर्षांत कात टाकणार आहे. नवीन आराखड्यानुसार स्थानकातील 14 फलाटांसह सोई-सुविधांसाठी तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पर्यटकांचेही हे आवडते शहर आहे. त्यामुळे येथे मोठी वर्दळ असते. परंतु एसटी स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, स्वच्छतागृहात अस्वच्छता आहे. प्रवाशांना बसण्यासाठी चांगली बाकडीही नाहीत. त्यामुळे प्रवासी नाक मुरडतात. आता या ठिकाणी नवीन स्थानक बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. 

पुणे येथील डिरोक्‍ट्रीक इंजिनिअरिंग कंपनीने मातीपरीक्षण करून त्याप्रमाणे नूतन इमारतीचा आराखडा तयार केला. त्यानुसार स्थानकात 14 फलाट बांधण्यात येणार आहेत. वाहन पार्किंग, तळमजला आणि पहिला मजला अशा पद्धतीने हे स्थानक आहे. तळमजल्यामध्ये फलाट आहे. प्रवाशांसाठी खास प्रतीक्षालय बांधण्यात येणार आहे. 

कर्मचाऱ्यांसह प्रवाशांसाठी उपाहारगृहाची सोय आहे. प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक कार्यालय असणार आहे. पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष आहेत. 

अलिबागमधील बसस्थानकास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. वास्तुविशारद गोडबोले, मुकादम ऍण्ड असोसिएट्‌स आहेत. 17 सप्टेंबरपर्यंत कामाच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. 19 सप्टेंबरला तांत्रिकदृष्ट्या पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. सुमारे 18 महन्यांपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 
- अरविंद सोनार, विभागीय अभियंता, रायगड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com