एसटीची बसस्थानके कात टाकणार...

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यातील बसस्थानकांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आता सर्वच बस स्थानके नवीन एकसमान रंगसंगतीमध्ये रंगवण्यात येणार आहेत. दिवाळीपुर्वी नववधुसारखी एसटीची बसस्थानके सजवण्यात येणार असून एसटीची बसस्थानके कात टाकणार आहेत.

मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यातील बसस्थानकांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आता सर्वच बस स्थानके नवीन एकसमान रंगसंगतीमध्ये रंगवण्यात येणार आहेत. दिवाळीपुर्वी नववधुसारखी एसटीची बसस्थानके सजवण्यात येणार असून एसटीची बसस्थानके कात टाकणार आहेत.

राज्यात सध्या सर्वच बसस्थानकांची अवस्था दयनिय आहे. नियमित रंगरंगोटी नाही, डागडुजी नाही, दुरुस्ती नाही त्यामुळे बसस्थानकांला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व बसस्थानके व परिसराची सुधारणा करण्यात आहे. महामंडळाने या बसस्थानकाच्या दुरुस्ती, नूतनीकरण, दर्जावाढीचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शासनाने दिलेल्या निधीतून स्वतः महामंडळ ही कामे करणार आहे. यासाठी महामंडळाने वास्तुविशारदांची समिती स्थापन केली आहे. हे वास्तुविशारद स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघ व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन वास्तू आराखडा बनवीत आहेत. आराखड्यानुसार इ-निविदा मागवून महामंडळाच्या अभियंत्याच्या देखरेखीखाली कंत्राटदाराकडून बसस्थानके बांधण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

एसटीचा लवाजमा
19 हजार बसचा ताफा
1 लाख 6 हजार कामगार
एकूण 609 बसस्थानके
वापरात असलेली 568 बसस्थानके
एक मुख्यालय
31 विभागिय कार्यालये
9 टायर पुनर्स्थिरिकरण प्रकल्प
3 मध्यवर्ती कार्यशाळा 
दररोज सरासरी 67 लाख प्रवाशी

 पहिल्या टप्प्यातील 79 बसस्थानकाच्या कामास सुरुवात 
- त्यासाठी शासनाने सुमारे 125 कोटी दिले
- अतिक्रमणापासून वाचण्यासाठी 113 ठिकाणी संरक्षक भिंत बांधणार
- नव्याने प्रस्तावात 29 बसस्थानकाच्या नूतनीकरण व पुनर्बांधणीला मंजुरी 
- निवडक मोठ्या बसस्थानकावर 60 आसनाची मिनी थिएटर्स बांधणार
- बसस्थानकाची जागा गरजेनुसार व्यावसायिक वापरासाठी विकसित करण्याचा पर्याय खुला
- त्यामाध्यमातून अतिरिक्त महसूल मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार
- सीएसआर फंडातून प्रसाधनगृहे बांधणार - - भारत पेट्रोलियमकजून 4.9 कोटी रुपये निधी
- त्यातून राज्यातील 22 स्वच्छतागृहे नव्याने बांधणार

बसस्थानकामध्ये आल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटावे म्हणून सर्व स्थानकांची रंगरंगोटी करत आहोत. सर्व स्थानके एकसारखी दिसावी म्हणून त्यांना एकच रंग देत आहोत. वर्षानुवर्ष नुतणीकरण झाले नाही. त्यामुळे सर्व स्थानक दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

- दिवाकर रावते परिवहन मंत्री

Web Title: renovation of st bus stands