महागड्या घरांचे भाडे झालेत 22 टक्क्यांपर्यंत कमी; कारण की....

luxury flats
luxury flats

मुंबई : कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन अंमलात आले, त्याचा फटका अर्थव्यवस्थेस बसला आहे. मुंबईतील आलिशान अपार्टमेंटच्या व्यवहारांवरही त्याचा परिणाम झाला नसेल तरच नवल होते. मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीतील मासिक भाडे 22 टक्क्यापर्यंत कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. 

महालक्ष्मी येथील प्लॅनेट गोदरेज बिल्डींगमधील पाच बीएचके फ्लॅटचे भाडे चार महिन्यांपूर्वी चार ते सव्वाचार लाख होते. तेच आता 3 लाख 60 हजार झाले असल्याचे वृत्त आहे. मुंबई सेंट्रल येथील रहेजा विवारिया येथे फार वेगळी परिस्थिती नाही. तिथे थ्री-बीचएके फ्लॅटचे भाडे साडेतीन लाख होते, ते आता तीन लाखच घेतले जात आहे. परळच्या अशोक टॉवर्समध्येही हेच घडले आहे. लॉकडाऊनपूर्वी येथील टू बीएचके फ्लॅटचे भाडे सव्वा लाख होते, ते एका लाखापर्यंत कमी झाले आहे. 

वरळीच्या लोढा पार्कमध्ये थ्री बीएचके फ्लॅटसाठी आता महिना सव्वा लाख आकारले जात आहेत. हाच दर चार महिन्यापूर्वी दीड लाख होता. क्रिसेंट बेमधील टू बीएचके फ्लॅटचे भाडे 85 हजारवरुन 75 हजारपर्यंत कमी झाले आहे. मुंबई शहरमध्येच नव्हे तर उपनगरातही हेच घडत आहे. अंधेरीतील ओबेरॉय सिटी हाईटस्मधील चार बीएचकेचे भाडे साडेतीन लाखावरुन पावणेतीन लाखपर्यंत कमी झाल्याचे वृत्त आहे. अर्थातच कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या, पगार कपात तसेच अनेक उद्योग बंद असल्याचा परिणाम झाला आहे. या उच्चभ्रू सोसायटीतील उच्च दर्जाच्या सुविधांमुळे तिथे राहण्यास बहुराष्ट्रीय कंपनीतील उच्च आधिकारी तसेच बिझनेसमन पसंती देत असत. मात्र सध्याच्या परिस्थितीत कमी भाड्याच्या घरास पसंती दिली जात आहे. 

देशातील बदलती आर्थिक परिस्थिती लक्झरी अपार्टमेंट तसेच फ्लॅटस््ची मालकी असलेल्यांनी ओळखली. पूर्वीपेक्षा जास्त भाडे मिळेल ही अपेक्षा बाळगणे चूकीचे आहे. ही अपेक्षा ठेवली तर कुणीच येणार नाही हे जाणून त्यांनी सूट देण्यास सुरुवात केली. आता अनेक आधिकाऱ्यांना नोकरीची खात्री वाटत नाही, या परिस्थितीत कमी भाडे असलेले घरच चांगले असा विचार होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मात्र त्याचवेळी लक्झरी अपार्टमेंटची संख्या लॉकडाऊन कालावधीत वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी विक्रीस काढलेल्या अपार्टमेंट आता भाड्याने देण्याचा विचार पुढे आला आहे. अपार्टमेंटना अपेक्षित किंमत मिळणार नाही, त्यासाठी हा विचार होत असल्याचेही काहींचे मत आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com