खोपोलीतील दिघे स्मारकाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

मुंबई : थोर साहित्यिक र. वा. दिघे यांच्या सन्मानार्थ खोपोली नगरपालिकेकडून र. वा. दिघे स्मारक उभारण्यात आले आहे. सद्य स्थितीत या स्मारकात अनेक समस्या असल्याने, दिघे यांच्या चाहत्यांत व शहरातील साहित्यप्रेमींमध्ये नाराजी आहे. 
र. वा. दिघे स्मारकात अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. भिंतीचा रंग निघून प्लास्टरही निघत आहे. येथील ग्रंथालय व वाचनालयासाठी चार महिन्यांपासून ग्रंथपालाची नियुक्ती रखडली आहे.

मुंबई : थोर साहित्यिक र. वा. दिघे यांच्या सन्मानार्थ खोपोली नगरपालिकेकडून र. वा. दिघे स्मारक उभारण्यात आले आहे. सद्य स्थितीत या स्मारकात अनेक समस्या असल्याने, दिघे यांच्या चाहत्यांत व शहरातील साहित्यप्रेमींमध्ये नाराजी आहे. 
र. वा. दिघे स्मारकात अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. भिंतीचा रंग निघून प्लास्टरही निघत आहे. येथील ग्रंथालय व वाचनालयासाठी चार महिन्यांपासून ग्रंथपालाची नियुक्ती रखडली आहे. तीन महिन्यांपासून एकही साप्ताहिक व मासिक येथे आलेले नाही. दोन कनिष्ठ श्रेणी महिला कर्मचारी, एक शिपाई संपूर्ण स्मारक व ग्रंथालय व वाचनालयाची देखभाल करत आहे. 

 

र. वा. दिघे स्मारकाची नियमितपणे रंगरंगोटी व डागडुजीबाबत नगरपालिका उदासीन आहे. स्मारकाच्या दर्शनी भागातील दिघे यांचे शिल्पही समस्यांनी घेरले आहे. त्याचे सुशोभीकरण करण्याचे अनेक वेळा आश्‍वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काहीही होत नाही. येथील स्वच्छतेबाबतही अनेक समस्या आहेत. 
उज्ज्वला दिघे, कवीयत्री 

र. वा. दिघे यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम नगरपालिका निधीतून पूर्ण समारंभपूर्वक साजरे केले जातील. तसेच डागडुजी व रंगरंगोटीची कामे व आवश्‍यक कर्मचारी नियुक्तीसाठीही कार्यवाही केली जाईल. 
सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair of Dighe smarak in Khopoli

फोटो गॅलरी