मुंबई - चर्नीरोड फलाटा बाहेरच्या पायऱ्यांची दुरुस्ती  

 दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई : गिरगाव येथील पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड फलाट क्र. 4 येथून बाहेर पडण्याच्या मार्गावरील पायऱ्या तत्काळ दुरुस्त करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न होत असल्याबद्दलची बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली आणि त्याची तत्काळ दखल घेत रेल्वे प्रशासनाने पायऱ्या दुरुस्ती करुन दिल्याने प्रवाश्यांनी सकाळ माध्यम आणि शिवसेना माजी नगरसेवक दिलीप नाईक यांचे आभार मानले.

या ढासळलेल्या पायऱ्या तात्काळ दुरुस्त केल्या गेल्या नाहीत तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करिल अशी ताकीद देत माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनास खडसावले होते. ढासळलेल्या पाय-यांमुळे प्रवाश्यांना फलाटावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती.येथे काही अंध, दिव्यांग, तसेच वरिष्ठ नागरिकांना, महिला प्रवाश्यांना तर मोठी डोकेदुखी ठरत होती.

या सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात कोणती अप्रिय घटना-दुर्घटना घडू नये म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी शिवसेनेच्या वतीने चर्नी रोड (1) स्टेशन मास्तरना निवेदन देत पायऱ्या तात्काळ दुरुस्त कराव्यात अशी  मागणी केली होती. गिरगावातील हा एकमेव रस्ता येण्याजाण्यासाठी सल्याने केळेवाडी, ठाकुरद्वार येथील प्रवाश्यांना हा एकच  मार्ग असल्याने पायऱ्या दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे होते.

सकाळच्या बातमीचा दणका बसला आणि निद्रिस्त रेल्वे प्रशासन जागे झाले. युद्ध पातळीवर काम सुरु होऊन धोकादायक स्थितीतील पायऱ्या काढून नवीन पायऱ्या तात्काळ बसविण्यात आल्या.

या बाबत सकाळ माध्यमाने शिवसेनेसह पाठपुरावा केला होता. पायऱ्या दुरुस्त झाल्याने पावसाळ्यात होणारी गैरसोय आणि त्रास मुक्त झाल्याचे सांगत माजी नागरसेवक दिलीप नाईक यांनी सकाळचे विशेष आभार मानित जन आंदोलनात सकाळ ची साथ अत्यंत मोलाची असल्याचे म्हटले आहे.

Web Title: repair of steps outside of the platform of charni road mumbai