दुरुस्ती वाहनच रुळावरून घसरले ; वाहतुकीचा चार तास खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

पालघर : पालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम रेल्वेच्या वाहतुकीचा तब्बल चार तास खोळंबा झाला. ऐन गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. उद्‌वाहन यंत्र बाजूला केल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. 

शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री रेल्वे रुळांवर अभियांत्रिकी कामादरम्यान उद्‌वाहन यंत्र काम करत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या किमान दीड-दोन तास उशिराने धावत होत्या. विरार डहाणू रोड दरम्यान उपनगरीय सेवाही यामुळे पूर्णपणे विस्कळित झाली होती. सकाळी 7.30 पर्यंत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या, तर उपनगरीय सेवा सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या. यामुळे वैतरणा ते डहाणू भागातील रोजचा प्रवास करणारे रेल्वे प्रवासी खोळंबले. स्थानकांवर प्रवाशाची गर्दी झाली होती. रेल्वेकडून उपनगरीय रेल्वे फलाटांवर यादरम्यान कोणती उद्‌घोषणा होत नसल्यामुळे प्रवासी संतप्त झाले. 

गंतव्याआधीच थांबे 

मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्यांचा मूळ थांबा असलेल्या स्थानकाआधीच थांबविल्या गेल्या. मुंबई सेंट्रलला थांबणारी 12902 गुजरात मेल दादर येथे शेवटचा थांबा म्हणून थांबविण्यात आली, तर 12928 वडोदरा एक्‍स्प्रेस, 59442 अहमदाबाद पॅसेंजर, 59024 दादर- वलसाड पॅसेंजर, तसेच 19218 सौराष्ट्र जनता एक्‍स्प्रेस बोरिवलीला थांबविण्यात आली. डहाणू-पनवेल मेमूला वसई येथे शेवटचा थांबा दिला गेला.

Web Title: Repairing vehicle collapses Detention four hours of transportation