उल्हासनगर - नगरसेवकांना निधीसाठी रखवडणारे आयुक्त राजेंद्र निंबाळकरांची बदली

Nimbalkar
Nimbalkar

उल्हासनगर : 2017 च्या पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना निधीसाठी रखडवून ठेवणारे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची पुण्याला अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी विदर्भातील वाशीममध्ये सीओ पदावर असलेले गणेश पाटील यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सोमवारी आयुक्तांचा पदभार स्विकारणार असून नागरी सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देताना उल्हासनगरला स्मार्ट सिटी बनवण्याचा ध्यास त्यांनी व्यक्त केला आहे.

आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहराला स्वच्छ करण्याकडे सुरवाती पासूनच लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी त्यांनी ओव्हरफ्लो झालेल्या म्हारळ जवळील डंपिंग ग्राऊंडला पर्याय म्हणून कॅम्प नंबर पाच मध्ये डंपिंगची पर्यायी व्यवस्था केली आहे. या डंपिंगच्या विरोधात शिवसेनेने मोर्चा काढल्यावर निंबाळकर यांनी अंबरनाथ ग्रामीण भागात डंपिंगच्या जागेची पाहणी केली होती. मालमत्ता कर वसुली व्हावी यासाठी तब्बल पाच वेळेस अभय योजना लागू केली. मात्र बड्या आसामींनी त्याकडे सपशेल पाठ फिरवल्याने या योजनेला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही.

जे नगरसेवक त्यांचे पॅनल स्वच्छ चकाचक ठेवतील त्यांना इनामाच्या रूपात विकासनिधी दिला जाईल ही निंबाळकर यांची युक्ती फळाला लागली असून त्यामुळेच शहरातील बहुतांश पॅनल टापटीप दिसू लागले आहे.मात्र माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी निंबाळकर हे विविध घोटाळ्यांना समर्थन दिल्याचा आरोप केल्याने निंबाळकर यांनी पुढील योजना काटेकोर पणे राबवल्या होत्या.

गेल्या 2017 च्या पालिका निवडणुकीत 78 नगरसेवक निवडून आले आहेत.त्यास 14 महिने झाले आहेत.मात्र नगरसेवकांना एक रुपयांचाही विकास निधी मिळालेला नाही.दोन तीन महिन्यांपूर्वी प्रत्येक नगरसेवकांना प्रभाग आणि नगरसेवक निधी म्हणून 16 लाख रुपये देण्याचे आश्वासन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तशी प्रक्रिया देखील सुरू झाली होती.मात्र त्यांनी वर्क ऑर्डर वर सह्याच केल्या नाही.नगरसेवकांना रखडवून ठेवले.अशी खंत नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com