कळवा रुग्णालयातील 2 परिचारिकांना कोरोना, सहकर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दोन परिचारिकाना 'कोरोना'झाल्याचे पुढे आले आहे

कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज  रुग्णालयातील दोन परिचारिकाना 'कोरोना'झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले रुग्ण, डॉक्टर व नातेवाईक यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

मोठी बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

यातील एका परिचारिकेला ठाण्यातील कौशल्य फाउंडेशन या खाजगी रुग्णालयात तर एकीला भाईंदर पाडा येथील महापालिकेच्या विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या मधील एक परिचारिका रुग्णालयातील प्रसूती कक्षात काम करीत होती. तर दुसरी परिचारिका रुग्णालयाच्या विलीगिकरण कक्षात काम करीत होती. या दोन्हीही परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सध्या शोध सुरू असून रुग्णालय प्रशासनाच्या वतीने रुगणालयातील प्रसूती कक्ष व लेबर वार्ड सील केला आहे. 

हे ही वाचा : काय सांगता ! 'सिगारेट' ओढल्याने कोरोनाचा धोका कमी? वाचा कोणी केलाय हा दावा

दरम्यान या मधील एका परिचारिकेला महापालिका विलगीकरन कक्षात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या परिचारिकेला कौशल्य फाउंडेशन या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र 'कोव्हीड 19'चा एका दिवसांचा उपचाराचा खर्च अंदाजे 30 हजार रुपये येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या परिचारिकेचा खर्च शासन करणार का ही शंका तीच्या नातेवाईकांना आहे.

महत्वाची बातमी  : खासगी रुग्णालयांबाबत महापौरांची आयुक्तांकडे 'ही' मागणी

महापालिकेने खर्च करावा
एकीकडे राज्य सरकार कडून कोरोना रुगणांचा राज्य सरकार कडून कोरोना रुगणांचा खर्च उचलला जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतू या संदर्भात यावर मोफत उपचारासाठी खर्च करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी दिलेल्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना रुग्णालय प्रशासना कडे नाहीत. या परिचारिका तर महापालिका रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असून त्यांचा सर्व खर्चाचा भार महापालिकेने उचलावा अशी मागणी येथील कर्मचाऱ्याच्या नातेवाईकानी केली आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता.

नक्की वाचा :  कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

या परिचारिकेच्या खाजगी रुग्णालयातील खर्चाच्या अथवा, मोफत उपचारासंदर्भात आयुक्तांकडून कोणताही प्रस्ताव आमच्या पर्यंत आलेला नाही."  -  डॉ. शैलेंश्वर नटराजन, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा.

Report 2 corona positive at kalwa hospital, endangering coworker's health


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report 2 corona positive at kalwa hospital, endangering coworker's health