esakal | कळव्यात टेम्पोची दुभाजकाला धडक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कळव्यात टेम्पोची दुभाजकाला धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातून (Thane) कळव्याकडे भरधाव वेगाने जाणारा टेम्पो रस्त्याच्या दुभाजकाला जोरात धडकल्याची घटना बुधवारी दुपारी कळवा पुलावर घडली. या अपघातात चालकासह क्लिनर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

टेम्पोचालक राजकुमार गौतम (४५) आणि क्लिनर निशांत गायकवाड (३०) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही टेम्पो घेऊन कळव्याकडे निघाले होते. कळवा पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

loading image
go to top