लाच मागणाऱ्या लोकसेवकास अटक

अच्युत पाटील
शुक्रवार, 25 मे 2018

बोर्डी : बोर्डीच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी उंट व एटी व्ही गाडी चालविण्याचा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यासाठी रुपये तीन हजाराची लाच मागणाऱ्या आरोपी लोकसेवक, तुषार तुकाराम पाटील (वय 25) वर्षे, शिपाई / चौकीदार, बंदर निरीक्षक डहाणू कार्यालय, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, डहाणू यांस लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

20 वर्षाच्या उंटगाडी व्यवसाय करण्याऱ्या तरूणाने बुधवारी (ता. 23) केलेल्या तक्रारीवरून गुरूवारी (ता. 24) लाचलुतपत विभागाने ही कारवाई केली. आरोपीच  3, 000 रूपयांची मागणी केली होती. स्विकारलेल्या रक्कमेसह आरोपीला रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान बोर्डीच्या किनाऱ्यावर मेरिटाईबोर्ड व कोणण विकास पर्यटन मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले वहानतळाचे काम अवैध रेती उपसा केल्याने अर्धवट बंद पडले आहे. असे असताना ग्रामपंचायत वहान चालकांकडून कर वसुल करीत आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत असल्याने नाराजी पसरली घोडा गाडी उंड गाडी एटीव्ही गाडी व्यवसाय करणाऱ्यांकडून ग्रामपंचायत सामान्य पावती देऊन कर वसूल करीत असताना मेरिटाईम बोर्डाचे कर्मचारी व्यवसाईकाना कारवाई करण्याचा दम देऊन पैसे उकळवत असल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे.

Web Title: representative arrest for bribe