अर्णब गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका, जेलबाहेर समर्थकांचा मोठा गराडा

सुनीता महामुणकर / सुमित बागुल
Wednesday, 11 November 2020

मागील सात दिवसांपासून अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीनाचा दिलासा मिळाला.

मुंबई, ता. 11 : मागील सात दिवसांपासून अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीनाचा दिलासा मिळाला. न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गोस्वामींंसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. जामीन नामंजूर करण्यात मुंबई उच्च न्यायालयाने चूक केली असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

त्यानंतर आज संध्याकाळी अर्णब गोस्वामी हे तळोजा जेलमधून बाहेर आलेत. अर्णब गोस्वामी हे तळोजा जेलबाहेर येणार असल्याचं समजल्यावर तिथे अर्णब यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. 

महत्त्वाची बातमी : सरकारकडून आली गोड बातमी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करता येणार लोकल प्रवास
 

मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीनाचा दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज न्या डॉ धनंजय चंद्रचूड आणि न्या इंदिरा बैनर्जी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

महत्त्वाची बातमी : नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार

जर आता या न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या मार्गाचा ऱ्हास होण्याच्या दिशेने प्रवास होईल. अशा वेळी उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करुन स्वतःचा विशेष अधिकार वापरायला हवा होता, अशा शब्दात न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर असमाधान व्यक्त केले. उच्च न्यायालये घटनात्मक पीठ असते, मात्र न्यायालये व्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याच्या प्रकरणात भूमिका घेत नाही, असे खडे बोल सुनावले.

एफआयआर दाखल असला आणि तपास सुरू असला तरी जामीन नाकारण्यात न्याय नाकारणे आहे, असे खंडपीठ म्हणाले.

मी कधीही गोस्वामी यांचे चॅनल पाहत नाही. राज्य सरकारनेही आवडत नसल्यास ते पाहू नये.  सरकारने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे, अशाप्रकारे नागरिकांना लक्ष्य करु नये, असेही खंडपीठाने सुनावले. दरम्यान अर्णब यांची आता जेलमधून सुटका झाली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

Republic TV Editor Arnab Goswami released from Taloja Jail after Supreme Courts order


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic TV Editor Arnab Goswami released from Taloja Jail after Supreme Courts order