'गो कोरोना गो' म्हणणाऱ्या रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

पूजा विचारे
Tuesday, 27 October 2020

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली.  उपचारासाठी सुनील तटकरे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

आठवले यांची प्रकृती उत्तम आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून ४ दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणारेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन आठवले यांनी केलं आहे. 

रामदास आठवले यांनीही ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नोयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

अधिक वाचा-  मुंबईत हाय अलर्ट, ड्रोन उडवण्यास पोलिसांची बंदी
 

गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले.

सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण 

तटकरे यांची सोमवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Republican Party of India president Ramdas Athavale tests positive Corona 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republican Party of India president Ramdas Athavale tests positive Corona