आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष साकारणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण साकार करुया, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रिपाइंच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. या वेळी सभेचे आयोजक रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, राजा सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आम्ही संपूर्ण देशात पोहोचविला असून ईशान्य भारतातील दुर्गम राज्यांतही रिपाइं पक्ष पोहोचल्याचे आठवले म्हणाले.

‘भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे रद्द करा’
महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे. त्यात तीन वर्षे भाजप आणि दोन वर्षे शिवसेनेला असे मुख्यमंत्रिपदाचे वाटप करावे, असे मी सुचविले होते; मात्र दोघांनी माझे न ऐकल्यामुळे सत्ता हातातून गेली आहे असे सांगत, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करून मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. भीमा-कोरेगावप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा , अशी मागणी आठवले यांनी या वेळी केली. तसेच झोपडीवासीयांना ४०० किंवा ५०० चौरस फुटाचे घर द्यावे, अन्यथा प्रकल्प राबवू नये. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे 
आठवले म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Republican side of Ambedkar's dream will come true