सरपंच सेवा संघाचे गटविकास अधिकाऱ्यास निवेदन

डिलेश्वर पंधराम 
सोमवार, 7 मे 2018

या निवेदनात सरपंच सेवा संघाने विविध मुद्यावर चर्चा केली.

गोरेगाव - नरेगाची कामे ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येतात पण कुशल कामाचे अनुदान निधी १ वर्षापासुन पंचायत समितीव्दारे दिल्या जात नाही तसेच अन्य कामाचे समस्या निवारण केल्या जात नाहीत. त्यामुळे सरपंच यांना त्रास सहन करावा लागतो. या समस्याचे तात्काळ निवारण करा. या आशयाचे निवेदन ता ७ मे सोमवारला सरपंच सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष ससेन्द्र भगत यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना देण्यात आले.

यावेळी सोमेश रहांगडाले, अल्का पारधी, तेजेन्द्र हरिणखेडे, विजय भोयर, जितेन्द्र डोंगरे, दुलीचंद रहांगडाले, राजेश कटरे, अल्का पाथोडे, दिप्ती पटले, मेघा राखडे, रत्नकला भांडारकर, गिता बिसेन, तेजेश्वर हरिणखेडे, योगेश चौधरी उपस्थित होते.

या निवेदनात सरपंच सेवा संघाने विविध मुद्यावर चर्चा केली. यात तालुक्यात ५५ ग्रामपंचायत असुन सन २०१५ ते २०१८ या आर्थिक वर्षात सिमेंट काँक्रीट रस्ते, शौचालय बांधकाम, शोष खड्डे, सिंचन विहीर, गोठे बांधकाम, गाडुळ खत व नँपेड खत टाके बांधकाम कुशल कामाअंतर्गत करण्यात आले पण देयके देण्यात आली नाहीत. ही देयके तात्काळ देण्यात यावी, ६०-४० च्या प्रमाणात कुशल कामांना मंजुरी देण्यात यावी, प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई, सबरी घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, हात पंपाचे साहित्य ग्रामपंचायत यांना देण्यात यावे जेणेकरुन पाणी टंचाई निर्माण होणार नाही, जनसुविधाच्या कामांना अग्रीम धनादेश देण्यात यावा, संगणक चालकांना १४ व्या वित्त आयोग अनुदान निधीतुन मानधन न देता ग्रामपंचायतव्दारे देण्यात यावे, असे आदेश पत्र ग्रामपंचायत यांना देण्यात यावे अशा अनेक मागण्याचे निवेदन सरपंच सेवा संघाने गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना दिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Request letter to Group Development Officer of Sarpanch Seva Sangh