स्मशानभूमीच्या समस्येबाबत पालिका आयुक्‍तांना निवेदन

स्मशानभूमीच्या समस्येबाबत पालिका आयुक्‍तांना निवेदन

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील स्मशानभूमीच्या समस्येबाबत ‘सकाळ’मध्ये गुरुवारी वृत्त प्रसिद्ध होताच जागरुक नागरिकांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन निवेदन दिले. आयुक्तांनीही समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांच्या शिष्टमंडळात जगदीश ठाकूर, राजेंद्र नांदोस्कर, समीर भोईर, निरंजन भोसले, दत्ता सावणे यांचा समावेश होता.

पालिकेच्या कल्याण येथील मुख्यालयात नागरिकांनी गुरुवारी स्मशानभूमीच्या समस्येविषयी चर्चा केली. स्मशानभूमीत सुरक्षारक्षक नेमणे, प्रकाश योजनेची व्यवस्था करणे, अंत्यविधीच्या नोंदीसाठी रजिस्टर ठेवणे या मागण्यांकडे नागरिकांनी लक्ष वेधले. तसेच स्मशानभूमी परिसरात ‘सार्वजनिक स्मशानभूमी’ अशा आशयाचा फलक लावावा, जेणेकरून सर्व समाजाच्या नागरिकांसाठी येथे अंत्यविधीची सोय उपलब्ध होईल, अशीही आग्रही मागणी करण्यात आली. आयुक्तांनी सर्व समस्यांची दखल घेऊन सार्वजनिक स्मशानभूमीचे फलक लावले जातील, असे आश्‍वासन नागरिकांना दिले. तसेच अशाप्रकारे सामाजिक आणि संवेदनशील प्रश्‍न नागरिकांनी मांडले, याबाबत त्यांचे विशेष कौतुकही केले. 

‘सकाळ’चे आभार
‘सकाळ’ने या सामाजिक विषयाबद्दल वृत्त प्रसारित केल्यानंतर इतर नागरिकही ही समस्या सोडवण्याच्या हेतूने चर्चेसाठी एकत्र आले आहेत. याबाबत ‘सकाळ’चे आम्ही आभारी आहोत, असे जागरूक नागरिक जगदीश ठाकूर यांनी नमूद केले.
स्मशानभूमीचा विषय दुर्लक्षित होता. ‘सकाळ’ने यावर प्रकाश टाकला हे स्तुत्य आहे. नागरिकांनी भेट घेत यावर चर्चा केली हेही कौतुकास्पद आहे. नागरिकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यात येतील.
- गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com