esakal | चल जाऊ गौरी गणपतीच्या सणाला! एसटी बसेससाठी तब्बल 8 हजार चाकरमान्यांचे आरक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

चल जाऊ गौरी गणपतीच्या सणाला! एसटी बसेससाठी तब्बल 8 हजार चाकरमान्यांचे आरक्षण

एसटी महामंडळाच्या 150 गाड्यांनी दोन हजार 500 चाकरमानी कोकणात दाखल झाले असून, सुमारे 8 हजार चाकरमानी कोकणात गौरी गणपतीच्या उत्सवासाठी एसटी बसचे आरक्षण केले आहे.

चल जाऊ गौरी गणपतीच्या सणाला! एसटी बसेससाठी तब्बल 8 हजार चाकरमान्यांचे आरक्षण

sakal_logo
By
प्रशांत कांबळे


मुंबई : एसटी महामंडळाच्या 150 गाड्यांनी दोन हजार 500 चाकरमानी कोकणात दाखल झाले असून, सुमारे 8 हजार चाकरमानी कोकणात गौरी गणपतीच्या उत्सवासाठी एसटी बसचे आरक्षण केले आहे. यामध्ये रविवारी 70 गाड्या गुरूवार ते रविवार या चार दिवसात एकूण 150 एसटीने आतापर्यंत सोडल्या आहे. 11 ऑगष्ट रोजी मंगळवारी सर्वाधिक 109 गाड्या कोकणासाठी धावणार आहे.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...! सामाजिक भान राखून अखेर पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

कोकणातील गौरी गणपतीच्या उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबई उपनगरातील चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहे. परिवहन मंत्र्यांनी यासाठी 3000 बसेस सोडण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 6 ऑगष्टपासून या बसेस सोडण्यात येत आहे. यामध्ये 6 ते 12 ऑगस्ट अखेर पर्यंत 550 बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका; उत्पादन क्षमतेत झालीये इतकी घट...

मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून सुटणार्‍या बसेस कोकणातील गावांपर्यंत धावणार आहे. असल्याने चाकरमान्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. 8 हजार प्रवाशांनी ऑनाईन तिकीट बुकिंग केले आहे, एसटीच्या ग्रृप बुकींग योजनेला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये रविवारपर्यत ग्रुप बुकिंगच्या 30 गाड्या आरक्षित झाल्या असून, या सर्व गाड्या कोंकणात रवाना होणार आहे.

गणेश भक्तांना दिलासा; बाप्पाची मूर्ती थेट येणार दारी 

12 ऑगष्टनंतरही सेवा सुरू राहणार
सुरूवातीला 6 ते 12 ऑगष्टपर्यंतच 'एसटी'ची सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र, आता 12 ऑगष्टनंतर सुद्धा एसटीची कोकणासाठी सेवा सुरूच राहणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image