संघर्षामुळेच मराठा समाजाला आरक्षण : एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

संघर्षामुळेच मराठा समाजाला आरक्षण :  एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणा एकाचे श्रेय नाही; तर मराठा समाजाने एकजुटीने आणि संघर्षाने आरक्षण मिळवले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठा समाजाच्या एकीमुळेच महाराष्ट्रात स्वराज्यची स्थापना झाली होती. आता पुन्हा एकदा सुराज्य येण्यासाठी मराठा समाजाने ही एकजूट कामय ठेवावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. रविवारी गडकरी रंगायतन येथे अखिल भारतीय मराठा फेडरेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मराठा मेळाव्यात ते बोलत होते. 


या वेळी समाजाच्या वतीने मराठा नेता म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. मेळावा होण्यापूर्वी मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला होता. त्याचा कोणताही उल्लेख न करता समाजाच्या विषयावर काम करण्यासाठी मी मंत्रालयात बसलो असल्याचे या वेळी शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयात मराठा समाजाचा हक्काचा मंत्री बसला असून समाजाच्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्‍वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठा समाजाचे अधिवेशन हे ठाण्यात होत आहे हा ठाणेकरांचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा समाजाने उद्योगधंड्याकडे वळावे 
मुंबईत मराठा भवन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतीलच; मात्र ठाणे महापालिकेनेदेखील मराठा समाजासाठी वसतिगृहाला जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या सर्व सूचना आरक्षण समितीमध्ये मी सातत्याने मांडत होतो. त्या वेळी समितीमधील इतर कोणीही त्याला विरोध केला नसल्याचे शिंदे यांनी या वेळी आवर्जून सांगितले. शैक्षणिक संधीचा फायदा घेण्याबरोबर उद्योगधंद्याकडे मराठा समाजाने वळले पाहिजे. मंत्रीपदाचा पुरेपूर वापर मी मराठा समाजाच्या कल्याणासाठी करणार असून, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com