आरक्षणाची पद्धत आमूलाग्र बदला - डॉ. महात्मे

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई - आरक्षणाचे लाभ त्या त्या जातीतील जेमतेम 10 टक्‍के लोकांना मिळाले आहेत. खऱ्या गरजूंपर्यंत ते लाभ पोचावेत, यासाठी आरक्षण देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची सूचना राज्यसभेचे सदस्य व धनगर आरक्षणासाठी आग्रहाची भूमिका मांडणारे डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे.

मुंबई - आरक्षणाचे लाभ त्या त्या जातीतील जेमतेम 10 टक्‍के लोकांना मिळाले आहेत. खऱ्या गरजूंपर्यंत ते लाभ पोचावेत, यासाठी आरक्षण देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची सूचना राज्यसभेचे सदस्य व धनगर आरक्षणासाठी आग्रहाची भूमिका मांडणारे डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे.

स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनंतरही आरक्षण खऱ्या गरजूंपर्यंत पोचले नसल्याने काही चाळण्या लावण्याची गरज त्यांनी व्यक्‍त केली आहे. मात्र, कोणत्याही जातीला वगळण्याची ही शिफारस नसून नव्याने मागास ठरणाऱ्या जातींना प्रतिनिधित्व देणे योग्य आणि आवश्‍यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्‍त केले आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील काही विशिष्ट कुटुंबांनाच आरक्षणाचा लाभ मिळतो, त्यामुळे खरे गरजू वंचित रहातात, असे डॉ. महात्मे यांचे मत आहे. शिवाय त्या त्या प्रवर्गातील काही विशिष्ट जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो. आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजवंतांना मिळावा, यासाठी त्यामुळेच नवे निकष लावण्याची गरज त्यांनी व्यक्‍त केली.

डॉ. महात्मे यांनी सुचवलेल्या या प्रणालीला त्यांनी भारीत सूचीकरण प्रणाली, वेटेड इंडेक्‍सिंग सिस्टीम असे नाव दिले आहे.
धनगर आरक्षणासाठी आपण लढत असता ही भूमिका विसंगत नाही काय असे विचारले असता डॉ. महात्मे म्हणाले, 'धनगरांना पूर्वघोषणेनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याबाबतचा अहवालही लवकर प्राप्त व्हायला हवा. योग्य लोकांपर्यंत आरक्षण पोचावे यासाठी प्रणाली सुचवली आहे. माझ्या मुलाला आरक्षण मिळण्याऐवजी ते मेंढपाळाला, खऱ्या गरजूंना मिळावे, यासाठी हे बदल सुचवले आहेत.''

डॉ. महात्मे यांनी सुचविलेले मुद्दे
- आरक्षणास पात्र असलेल्या मुलामुलीला काही निकषांवर उणे तर, काही निकषांवर अधिक गुण देऊन तक्‍ते तयार करावेत
- पालिका, महापालिका, जिल्हा परिषद शाळात शिकलेल्या मुलांना उणे गुण द्यावेत
- प्राथमिक, माध्यमिक शाळांनुसार उणे भारांकन ठरवावे
- आरक्षणाच्या चौकटीत प्रवेशताना मुलींना अतिरिक्‍त उणे गुण द्यावेत
- एका पालकाचे निधन झाले असेल तर उणे गुण वाढवावेत
- पालकांमध्ये दहावी अनुत्तीर्ण, दहावी उत्तीर्ण, पदवीधर असे गट पाडून अल्पशिक्षित पालकांच्या मुलांना प्राधान्य द्यावे.
- ज्या मुलामुलींच्या पालकांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे, त्यांना वगळण्यात यावे
- नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदारांच्या मुलामुलींना कोणतीही सवलत देऊ नयेत
- आरक्षित मतदारसंघातून निवडून आलेल्या व्यक्तिला पुन्हा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे.

Web Title: reservation process dr. vikas mahatme