'सिंहगड'मध्ये महिलांसाठी पुन्हा आरक्षित डबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

मुंबई-पुणे सिंहगड एक्‍स्प्रेसमधील महिला प्रवाशांसाठी अर्ध्याऐवजी नवा संपूर्ण डबा मिळाल्याने त्यांची गैरसोय दूर झाली आहे. अर्ध्या डब्यामधून प्रवास करताना अनेक जणींना जागेअभावी खाली बसून प्रवास करावा लागे. ही गैरसोय दूर करण्यासाठी कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. 

नेरळ : मुंबई-पुणे सिंहगड एक्‍स्प्रेसमधील महिला प्रवाशांसाठी अर्ध्याऐवजी नवा संपूर्ण डबा मिळाल्याने त्यांची गैरसोय दूर झाली आहे. अर्ध्या डब्यामधून प्रवास करताना अनेक जणींना जागेअभावी खाली बसून प्रवास करावा लागे. ही गैरसोय दूर करण्यासाठी कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. 

काही दिवसांपूर्वी सिंहगड एक्‍स्प्रेसचा महिलांचा आरक्षित डबा रेल्वे प्रशासनाने बदलून "कट बोगी' लावली होती. याविरोधात महिला प्रवाशांनी मुंबई येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर विचार झाला नाही. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी पुणे व मुंबई येथील रेल्वे विभागीय व्यवस्थापक; तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना ट्विट करून ही समस्या मांडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी डबा बदलला. 

Web Title: Reservations reserved for women in Sinhagad